कंधार : ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणून आल्यानंतर आलं सदस्य निवांत असतात. मात्र, जे सदस्य आरक्षित जागेवर निवडून आले आहेत. त्यांना निवांत राहुल चालणार नाही. तर त्यांना शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत. जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. याकडे दुर्लक्ष केल्यास सदस्यत्व जातो. अशाच प्रकारे कंधार तालुक्यातील 91 सदस्य अपात्र ठरले आहेत. त्यात कौठा परिसरातील आठ गावांतील 19 सदस्यांचा समावेश आहे.
कंधार तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणूक २०२०-२१ मध्ये निवडून आलेल्या कौठा परिसरातील कौठा ३ तेलूर ४ चौकीमहाकाया ४ शिरुर १ राऊतखेडा १, काटकंळबा १, धानोरा (कौठा) ५ अशें आठ गावाचे १९ सदस्य अपात्र ठरले आहेत. त्यामुळे यातील काही गावांत सरपंचपद हे अल्पमतात आल्याने सारपंचाची डोकेदुखी वाढली आहे (Gram panchayat members are disqualified and sarpanch is in trouble)
ग्रामपंचायत निवडणुकीत पँनल बनवून निवडणूक लढवली. परंतु, काठावरील बहुमत असलेल्या गावात आता सरपंच पद राहतो की जातो, अशी भीती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली. परंतु, सदस्यांनी दुर्लक्ष केले. (Gram panchayat members are disqualified and sarpanch is in trouble)
दोन गावांचे सरपंच तर १७ सदस्य यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरविण्यात आल्याने सरपंचासह सदस्य न्यायालयात धाव घेतली आहे. ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरविण्यात आल्याने विरोधी गटांकडून आंनद व्यक्त केला जात आहे.