Nanded Heat Wave Alert : नांदेडमध्ये 14-15 मे रोजी यलो अलर्ट, उष्मालाटीचा इशारा

 

Nanded Heat Wave Alert  नांदेड, दि. 12 मे : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 14 आणि 15 मे 2026 या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात या कालावधीत तुरळक ठिकाणी उष्मालाट (Heat Wave) परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

 

Maharashtra Officials Denmark Visit। पंतप्रधानांचा ‘स्वदेशी’चा नारा, अन् अधिकाऱ्यांची परदेशवारीची तयारी

 

उष्मालाटीच्या काळात शरीरातील पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून तहान नसली तरी नियमित पाणी पिणे गरजेचे आहे. ओआरएस, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी, घरगुती लस्सी, भाताची पेज यांसारखे द्रवपदार्थ घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड किंवा यकृत विकार असलेल्या नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्रवपदार्थांचे सेवन करावे. तसेच हलक्या रंगाचे, सैलसर आणि सुती कपडे वापरणे, घराबाहेर पडताना डोके झाकणे, टोपी, छत्री, गॉगल आणि सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. अतिउष्णतेमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व स्थूल व्यक्तींना अधिक धोका असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

दहावी-बारावी पुरवणी परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर | SSC HSC Supplementary Exam Maharashtra

 

 

नागरिकांनी विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. श्रमाची कामे, अनवाणी फिरणे, तेलकट-तिखट पदार्थ, शीतपेये, चहा, कॉफी आणि मद्यपान टाळावे. तसेच वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी एकटे सोडू नयेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. उष्माघातासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

Local ad 1