नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 383 ग्रामपंचायत सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

नांदेड  : आरक्षित जागेवर निवडून आलेल्या जिल्ह्यातील 1 हजार 383 सदस्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) विहित मुदतीत सादर केले नाही. तसेच त्यांना संधी देवूनही ते आपल्या प्रमाणपत्राची वैधता सादर करू शकले नाही. अशा 1 हजार 383 उमेदवारांची निवड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांनी रद्द केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांना दणका दिला आहे. (1 thousand 383 gram panchayat members of Nanded district disqualified)

निवड रद्द झालेल्या सदस्यांची तालुकानिहाय उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड 15, अर्धापूर 54, भोकर 138, मुदखेड 53, हदगाव 108, हिमायतनगर 70, किनवट 34, माहूर 19, धर्माबाद 99, उमरी 142, बिलोली 61, नायगांव 112, देगलूर 121, मुखेड 139, कंधार 91, लोहा 127 अशी एकूण 1 हजार 383 असे उमेदवार आहेत. (1 thousand 383 gram panchayat members of Nanded district disqualified)

महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 (1-अ) अन्वये (Under Section 10 (1-A) of the Maharashtra Gram Panchayat Act, 1958) जे उमेदवार आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर करतील त्या उमेदवारांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची तरतूद आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. (1 thousand 383 gram panchayat members of Nanded district disqualified

 

ब्रेकिंग न्यजू । दहावी-बारावीची निकाल कधी लागणार ? जाणून घ्या..

राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) आदेशान्वये माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर (General election program for Gram Panchayat announced) केला होता. या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी पार पडली होती. माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागेतून निवडणूक लढवून आल्यानंतर शासनाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 17 जानेवारी 2023 पर्यत अंतिम मुदतवाढ दिली होती. अखेर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 18 मे 2023 रोजीच्या आदेशान्वये 1 हजार 383 उमेदवार अनर्ह केले आहे. (1 thousand 383 gram panchayat members of Nanded district disqualified)

 

Local ad 1