कंधार तालुक्यातील 91 ग्रामपंचायत सदस्य ठरले अपात्र

कंधार : आरक्षित जागेवर निवडून आलेल्या नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 383 सदस्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र (caste validity certificate maharashtra) विहित मुदतीत सादर केले नाही. तसेच त्यांना संधी देवूनही ते आपल्या प्रमाणपत्राची वैधता सादर करू शकले नाही. अशा 1 हजार 383 उमेदवारांची निवड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Nanded Abhijeet Raut) यांनी रद्द केली आहे.  त्यात कंधार तालुक्यातील 91 सदस्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये धानोरा आणि तेलूर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि चौकी महाकाया ग्रामपंचायतीचे उपसरपंच अपात्र ठरले आहेत. या संदर्भातील एक आदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (91 gram panchayat members of Kandahar taluka were disqualified)

 

निवडणूक आले अन् निर्धास्त झाले

ग्रामपंचायत सदस्य ते राष्ट्रपती पदांच्या निवडणुकीत ग्रामपंचात सदस्य पदाची निवडणूक ही चुरशी होत असते. या निवडणुकीमुळेच भावा-भावात, शेजाऱ्या-शेजाऱ्यात वैर निर्माण होतो. निवडणूक संपल्यानंतरही अनेकजण एकमेकांशी बोलत नाहीत. यामध्ये  विजयी झालेला उमेदवार हा उत्सव साजरा करतो. त्यानंतर गावांत सदस्य म्हणून फिरत असतो. ज्या उमेदवाराने आरक्षित जागेवार निवडणूक लढवली. त्याला जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागतो, हे तो विसरून जातो. अशाच प्रकारत कंधार तालुक्यातील 91 ग्रामपंचायत सदस्य सदस्य म्हणून अपात्र ठरले आहेत. (91 gram panchayat members of Kandahar taluka were disqualified)

बारावीचा निकाल दुपारी ऑनलाईन जाहिर होणार ; कसा पाहाल निकाल

काय म्हणतो कायदा

महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 10 (1-अ) अन्वये (Under Section 10 (1-A) of the Maharashtra Gram Panchayat Act, 1958) जे उमेदवार आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर करतील त्या उमेदवारांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची तरतूद आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. (91 gram panchayat members Kandahar taluka disqualified)

 

अपात्र ठरलेल्या सदस्यंची यादी पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

 

 

अपात्र ठरलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची यादी

गंगणबीड : बैनवाड संगिता रामराव आणि कुऱ्हाडे कोंडाबाई रामराव लाठ खूर्द : जाधव कल्पना सुनील, कऊटकर रंजना विठ्ठल, पैलवार गंगाबाई बालाजी, बाबळे अहिल्याबाई शेषराव. चिखलभोसी : तेलंग शिवकांता मनोहर. शिरूर :गिरी गंगाबाई व्यंकटगिर. राउतखेडा : कांबळे मारोती मरीबा. काटकळंबा : विभूते लक्ष्मण दिगांबर. मंगलसांगवी : तोटेवाड सिमा अंकुश आणि पांचाळ सुंदराबाई पंढरी. धानोरा कौठा : तळणे जनाबाई तुकाराम, हात्ते अंजनाबाई बाबाराव, नवघरे गजुबाई नागोराव आणि नवघरे गणेश नागोराव. चिखली : करेवाड सुर्यभान नागोराव. खंडगाव : खेने गणेश हनुमंत आणि कोपलवाड सुंदरबाई बालाजी. वाखरड : बालाजी मरीबा वाघमारे. बोरी बु. : वाघमारे बालाजी बळीराम आणि कागणे कलावती उद्धव. कारतळा : श्रीरामे चंद्रभागाबाई व्यंकटी. वहाद : ज्योती सोपान गायकवाड. तळ्याचीवाडी : राडोड तात्याबाई शंकर. बाभुळगाव  : शोभा ज्ञानेश्वर जेलेवाड, उत्तम तुकाराम गायकवाड आणि चकलवाड राजू जयवंता. सावळेश्वर : कांबळे  भिमाबाई काशिराम.
पानशेवडी : नरवडे सुमित्रा किरण. भंडारकोमट्याची वाडी : रुक्मिनीबाई किशन भिसे. उस्माननगर : पिंजारी जुबेदाबी  शरिफ. कल्हाळी : इटकापल्ले सुमन नारायण आणि संभाजी माधव गडगड. रूई : कडगपल्ले कोंडीबा मुक्ताजी. मरशिवणी : यमुलवाड राम गोविंद, उलहुलगवाड वर्षा ज्ञानेश्वर आणि रायवाडे चौत्राबाई नागोराव. मसलगा : हनमाबाई नागोराव बोलणवाड,गायकवाड राधा सटवा आणि नरवाडे लक्ष्मीबाई आनंदा. येलुर : डोंगरे शोभाबाई गणेश आणि सुकेवार राधाबाई शंकर. हाटक्याळ : वाघमारे दयानंद बालाजी आणि दिंडे दामोदर तुळशीराम. बोळका : करेवाड शोभा महादु आणि कांबळे जनाबाई राजीव. मोहिजा पारंडा : बादलवाड लक्ष्मण श्राीराम आणि मनिषा ओमकार नरवडे. गुंटुर : खदाडे शितल नागनाथ. पेठवडज : मेकवाड शिवाजी संभाजी, कडमपल्ले शोभा कैलास, पुटवाड ललिता सत्यपाल, वंचेवाड पारूबाई व्यंकटी आणि घुलमवाड अहिल्याबाई व्यंकटी. लाडका : बोयवारे विश्वांभर जळबा आणि अंकले संतोष नारायण. कौठा  : शंकर किशन घोरपडे, पुजा बाबुराव घोरपडे आणि देशमुख महानंदा भुजंग. बहादरपुरा : तोटवाड बालाजी  माणिका. बाळांतवाडी : वाघमारे जयश्री आणि वाघमारे सुंदरबाई शेषेराव. दहिकळंबा : नगगोपाळ कोंड्याबाई हानमंत.
कुरुळा : दवळे दैवशाला उत्तम. फुलवळ : फूलवळे शांताबाई देविदास. घोडज : कुशवतीबाई आवाराव घोडजकर, कांबळे शोभाताई ज्ञानोबा आणि टोकलवाड महानंदा आनंदराव. गुंडा-दिंडा-बिंडा : पेटेवाड अंजनाबाई पंडितराव. भुत्याचीवाडी : कागदेवाड़ कैलास शेषेशाराव  आणि गडमवाड अनिता ज्ञानोबा. शिर्सी बु.: नवघरे सरसाबाई उत्त. तेलुर : कमलावाई किशन वाघमारे, सावित्राबाई बाबा भंडारे, चतुराबाई रामु कउटकर आणि गोविद बालाजी दावलमलके. दैठणा :  वाघमारे मल्हारी दरशरथ, केंद्र गिरजा बालाजी आणि केंद्रे सागरबाई बालाजी. गोगदरी  : बोईनवाड लक्ष्मीबाई विक्रम. भेंडेवाडी : मुसळे शुत्रुघन बालाजी. चौकीमहाकाया : घोरपडे मंदाबाई नागोराव, राठोड दत्तात्र्य बळीराम, काळेकर माधव सोपान आणि कांबळे सरुबाई दौलतराव. हिपरागा शाहा : भारती शेषाबाई मधुसुदन.
Local ad 1