भावनिक क्षण ! लेकींनी केले वडिलांच्या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन

 

नांदेड, दि.१८ मे २०२६ : नांदेड जिल्ह्यातील काटकळंबा येथील भूमिपुत्र तथा सध्या नवी मुंबईतील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुभाष जीवनराव पाटील यांच्या ‘एका श्वासाचं अंतर’ या चौथ्या पुस्तकाचे प्रकाशन अत्यंत भावनिक आणि आगळ्यावेगळ्या वातावरणात पार पडले. या पुस्तकाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रकाशन सोहळा त्यांच्या जिजा आणि नेत्रा या दोन लेकींच्या हस्ते करण्यात आला. काटकळंबा येथील राहत्या घरी झालेल्या या कार्यक्रमाने बाप-लेकीच्या नात्यातील हळवेपणा आणि जिव्हाळा अधोरेखित केला. (ekaa shwasach antar book launch by daughters)

 

 

मेडिकल दुकाने बंद राहणार? अन्न व औषध प्रशासनाने दिला महत्त्वाचा इशारा

 

 

उपस्थित मान्यवरांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करत, हा क्षण संस्मरणीय आणि भावनिक असल्याचे मत व्यक्त केले. ‘एका श्वासाचं अंतर’ हे पुस्तक पुणे येथील महाजन पब्लिशिंग हाऊस तर्फे प्रकाशित करण्यात आले आहे.

 

प्रा. सुभाष पाटील गेली १५ वर्षे नवी मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असून सध्या ते प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. २०११ पासून साहित्य क्षेत्रात सक्रिय असलेल्या पाटील यांची यापूर्वी ‘धिक्कार’, ‘बंदिस्त महामानव’ आणि ‘शब्दप्रहार’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

 

‘एका श्वासाचं अंतर’ हे त्यांचे चौथे पुस्तक असून त्यांच्या साहित्य प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच त्यांचे ‘अधीर’ हे पाचवे पुस्तकही लवकरच वाचकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हा प्रकाशन सोहळा साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला असून, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक बंध अधिक दृढ करणारा क्षण म्हणून स्मरणात राहणार आहे.

 

 

 

 

 

 

Local ad 1