राज्यातील 608 ग्रामपंचयतींच्या निवडणुका जाहीर, सरपंचाची जनतेतून थेट होणार निवड

मुंबई : राज्यात सत्तातर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचे सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) घेतलेले अनेक निर्णय बदलण्यात आले. त्यात थेट सरपंच पदाचा ही समावेश आहे. शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार (Sarpanch will be elected directly from the people) आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील 608 ग्रामपंचायतीचा निवडणूक जाहीर केला आहे. (Elections for 608 Gram Panchayats in the state announced)

 

निवडणूक कार्यक्रम जाणून घ्या
निवडणूक कार्यक्रम जाणून घ्या

 

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२२ माहे जानेवारी २०२१ मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या व जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीव्दारे राबवली जाणार आहे. (Elections for 608 Gram Panchayats in the state announced)

 

जिल्हानिहाय ग्रामपंचायत संख्या
जिल्हानिहाय ग्रामपंचायत संख्या

 

राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, नाशिक, पुणे, अहमदनगर, लातूर, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंतींचा समावेश आहे. (Elections for 608 Gram Panchayats in the state announced)

 

 

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल.

 

नांदेड जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींचा समावेश

नांदेड जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक किनवट तालुक्यातील 47, माहूर 24, नायगांव 4, लोहा 5, कंधार 4, मुखेड 5, मुदखेड 3, अर्धापूर आणि देगलूर तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. (Elections for 608 Gram Panchayats in the state announced)
Local ad 1