महाराष्ट्र युवक काँग्रेस बैठक पुणे | युवकांच्या प्रश्नांवर संघर्ष तीव्र करण्याचा निर्णय
पुण्यात राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न; शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि आंदोलनात्मक भूमिकेवर सविस्तर चर्चा
पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची राज्य कार्यकारिणी बैठक मंगळवारी पुण्यातील काँग्रेस भवन येथे पार पडली. या बैठकीस राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रभारी अजय छिकारा यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीची अध्यक्षता प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केली. सह-प्रभारी नवज्योत संधू आणि शांभवी शुक्ला यांनीही उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. (maharashtra yuva congress meeting pune youth issues struggle)
Pune NCP politics। पुण्यात अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक ! भाजपला भिडण्यासाठी निलेश निकम गटनेते
बैठकीदरम्यान आगामी राजकीय कार्यक्रम, संघटनात्मक बळकटीकरण, युवकांचे प्रश्न, विद्यार्थी-शिक्षण विषयक मुद्दे, रोजगार, सामाजिक न्याय तसेच राज्यभरातील युवक काँग्रेसच्या आंदोलनात्मक भूमिकेचा आढावा घेण्यात आला. यासोबतच पुढील कार्ययोजना निश्चित करण्यात आली. जिल्हा, शहर आणि बूथ स्तरावर संघटन विस्तार, सक्रिय सदस्य नोंदणी वाढवणे आणि जनहिताच्या मुद्द्यांवर ठोस भूमिका घेण्यावर विशेष भर देण्यात आला.
यावेळी बोलताना अजय छिकारा म्हणाले, “महाराष्ट्रातील युवक काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मैदानात उतरून जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला पाहिजे. युवकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शिक्षण, रोजगार आणि हक्कांच्या लढ्यात युवक काँग्रेस अग्रभागी राहील.”
याच बैठकीत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची ‘अलुमनी’ (Alumni) रचना उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून माजी प्रदेशाध्यक्ष तसेच शहर, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जबाबदाऱ्या सांभाळलेल्या वरिष्ठ नेत्यांना एकत्र आणले जाणार आहे. हे वरिष्ठ नेते मार्गदर्शन, मेंटॉरिंग आणि संघटनात्मक पाठबळ देणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आपल्या भाषणात युवक संघटन अधिक गतिमान करण्यावर भर देत राज्यभर युवकांच्या प्रश्नांवर तीव्र लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, प्रदेश मीडिया चेअरमन व महासचिव अक्षय जैन, महासचिव प्रविण बिरादर, कौस्तुभ नवले, उमेश पवार, सौरभ अमराळे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

