...

साताऱ्यातील शेतकऱ्याच्या डाळिंबांना पुणे मार्केट यार्डात किलोचा मिळाला उच्चांकी भाव

पुणे :  सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या डाळिंबांना पुणे मार्केट यार्डातील फळबाजारात विक्रमी दर मिळाल्याची सुखद बातमी आहे. मोही गावातील शेतकरी सचिन आबाजी देवकर यांनी विक्रीस पाठविलेल्या चांगल्या प्रतीच्या डाळिंबांना प्रति किलो ६०० रुपये असा उच्चांकी भाव मिळाला. (satara man taluka pomegranate price 600 pune market yard)

 

लोहा नगरपालिकेतून धडा : महापालिकेत भाजपने आमदार-खासदारांच्या नातेवाईकांचा पत्ता कट !

सचिन देवकर यांनी पुणे मार्केट यार्डातील रावसाहेब दिनकर कुंजीर यांच्या गाळ्यावर एकूण ४०० किलो डाळिंबे विक्रीस पाठविली होती. यापैकी उत्कृष्ट प्रतीच्या ३६ किलो डाळिंबांना ६०० रुपये किलो,१८ किलो डाळिंबांना ४०० रुपये किलो, तर उर्वरित डाळिंबांना प्रतवारीनुसार ३३५ रुपये, २८० रुपये आणि २३५ रुपये प्रति किलो असे दर मिळाले.या डाळिंबांची खरेदी फळ व्यापारी धनराज मोटे यांनी केली.

 

डाळिंब व्यापारी शरद कुंजीर यांनी सांगितले की, “सचिन देवकर यांनी २३ प्लास्टिक जाळ्यांमधून (क्रेट्स) ४०० किलो डाळिंबे विक्रीस पाठविली होती. डाळिंबांची प्रतवारी उत्कृष्ट असून विशेषतः भगवा जातीच्या डाळिंबांना चांगले दर मिळाले.”

 

दरम्यान, शेतकरी सचिन देवकर यांनी सांगितले की, “मी सहा एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून डाळिंब उत्पादन घेत असून लागवडीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करण्यात येतो. यंदा डाळिंबांना उच्चांकी भाव मिळाल्याने समाधान आणि आनंद वाटत आहे.”

 ❓ प्रश्नोत्तर (Q&A)

प्रश्न 1 : पुणे मार्केट यार्डात डाळिंबांना किती भाव मिळाला?
👉 चांगल्या प्रतीच्या डाळिंबांना प्रति किलो ६०० रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला.

प्रश्न 2 : डाळिंबे कोणी विक्रीस पाठविली होती?
👉 सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मोही गावातील शेतकरी सचिन आबाजी देवकर यांनी डाळिंबे विक्रीस पाठविली.

प्रश्न 3 : कोणत्या जातीच्या डाळिंबांना जास्त दर मिळाला?
👉 भगवा जातीच्या डाळिंबांना सर्वाधिक दर मिळाला.

प्रश्न 4 : डाळिंबांची खरेदी कोणी केली?
👉 फळ व्यापारी धनराज मोटे यांनी डाळिंबांची खरेदी केली.

प्रश्न 5 : शेतकऱ्याने लागवडीसाठी कोणती पद्धत वापरली?
👉 डाळिंब लागवडीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला.

Local ad 1