...

प्रभाग २७ मध्ये राजकीय समीकरण बदलतेय? अजित पवार गटाची ताकद वाढली

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) दिवसेंदिवस अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली.

 

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र, अजित पवार यांची घोषणा

 

या वेळी प्रभाग क्रमांक २७ मधील अनुभवी व ज्येष्ठ राजकीय कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार उपस्थित होते. दरम्यान, दीपक जाधव यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळाल्याचे चित्र आहे.

 

 

या बैठकीत पक्षाकडून जो अधिकृत उमेदवार घोषित केला जाईल, त्याच्या पाठीशी सर्व इच्छुक उमेदवार एकत्र येऊन पूर्ण ताकदीने उभे राहतील, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. येत्या १६ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पॅनल विजयी करण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

 

 

या बैठकीस इच्छुक उमेदवार विवेक कांबळे, सुमित डोळस, निखिल काळे, छत्रभुज झाडे, विशाल भालेराव, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, अमित भालेराव, संदीप पिसाळ, नितीन ओव्हाळ, युवराज प्रगणे, प्रमोद चाबुकस्वार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

 

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना काटे म्हणाले, गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

Local ad 1