पुण्यात शेवटी काँग्रेस-शिवसेनेच ठरलं ! कोणाला किती जागा मिळाल्या ?
सोमवारी सतेज पाटील करणार घोषणा !
पुणे : शहरातील राजकारण सध्या अस्थिरतेच्या टप्प्यातून जात आहे. महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे प्रमुख नेते अनुपस्थित राहिल्याने पुणे महापालिका निवडणुकीबाबत नवी अनिश्चितता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याच्या चर्चा सुरू होत्या. जागावाटपावर दोन्ही गटांमध्ये बैठका झाल्या, मात्र अजित पवार गटाचा प्रस्ताव मान्य नसल्याने शरद पवार गट चर्चेतून दूर राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला वगळून जागा वाटपाचा फार्म्युला ठरवला आहे. त्याची घोषणा सोमवारी काँग्रेसचे निवडणूक प्रभारी सतेज पाटील पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली. (pune mahanagarpalika nivdanuk sharad pawar ajit pawar mahavikas aaghadi)
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र, अजित पवार यांची घोषणा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, जागावाटपावर एकमत न होणे आणि काही मूलभूत मुद्द्यांवरील मतभेदांमुळे महाविकास आघाडीबाबत चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुण्यातील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांची गोपनीय बैठक झाली होती. या बैठकीला शरद पवार गटातील काही प्रमुख नेते उपस्थित होते. त्यामुळे आघाडी मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र रविवारी झालेल्या अधिकृत बैठकीला शरद पवार गट गैरहजर राहिल्याने राजकीय समीकरणे पुन्हा बदलताना दिसत आहेत.
लोहा नगरपालिकेतून धडा : महापालिकेत भाजपने आमदार-खासदारांच्या नातेवाईकांचा पत्ता कट !
यामुळे शरद पवार पुढे कोणती भूमिका घेणार, तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, याबाबत संभ्रम अधिक गडद झाला आहे. पुण्याच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बारामतीत नेमकं काय शिजतंय?
रविवारी बारामती येथे गौतम अदानी यांच्या हस्ते एआय सेंटरचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये सुमारे एक मिनिट शांत संवाद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा युतीचा काही मार्ग निघणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्याचवेळी पुण्यातील महाविकास आघाडीच्या बैठकीला शरद पवार गट गैरहजर राहिल्याने संभ्रम अधिक वाढला आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वेळेत कळवण्यात आले होते, मात्र दुपारपर्यंत कोणीही उपस्थित राहिले नाही. तरीही त्यांच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आमची १६५ जागांची यादी तयार आहे. आज रात्रीपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल. काँग्रेस आणि ठाकरे गट पूर्ण ताकदीने निवडणूक लढवतील.” – अरविंद शिंदे (शहराध्यक्ष, काँग्रेस)
“शरद पवार गटातील नेते सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेससोबत जागावाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील निर्णय वरिष्ठ पातळीवरच होईल.” – संजय मोरे (शहराध्यक्ष, शिवसेना – ठाकरे गट)
प्रश्न – उत्तर (Q&A)
प्रश्न 1 : महाविकास आघाडीच्या बैठकीला कोण गैरहजर होते?
उत्तर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे प्रमुख नेते बैठकीला गैरहजर होते.
प्रश्न 2 : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र निवडणूक लढवण्याची चर्चा का अयशस्वी ठरली?
उत्तर : जागावाटपावर एकमत न झाल्याने आणि मूलभूत मतभेदांमुळे चर्चा पुढे जाऊ शकली नाही.
प्रश्न 3 : बारामतीतील कार्यक्रमामुळे कोणत्या चर्चा सुरू झाल्या?
उत्तर : शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संवादामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले.
प्रश्न 4 : काँग्रेस आणि ठाकरे गटाची पुढील भूमिका काय आहे?
उत्तर : राष्ट्रवादी गट प्रतिसाद देत नसल्याने काँग्रेस आणि ठाकरे गट स्वतंत्रपणे जागावाटप करून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

