...

भाजपकडून खोट्या आरोपांची मोहीम ; बाबुराव चांदेरे यांचा थेट आरोप

 

पुणे : प्रभाग क्रमांक ९ (बाणेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे, सुतारवाडी, पाषाण व सोमेश्वरवाडी) येथील महानगरपालिका निवडणुकीत जनतेचा स्पष्ट कौल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झुकताना दिसत असल्याने, भाजपकडून हताशपणे दिशाभूल आणि बदनामीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चांदेरे यांनी केला आहे. भाजपचे उमेदवार गणेश कळमकर हे जाणीवपूर्वक खोटी, दिशाभूल करणारी आणि बदनामीकारक माहिती पसरवत असून, निवडणूक तोंडावर असताना चांदेरे यांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. (baburao chandere bjp defamation ncp pune ward 9 election)

 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर

 

 

विरोधकांकडून ज्या कथित गुन्ह्याचा उल्लेख केला जात आहे, त्याबाबत वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे आवश्यक असल्याचे चांदेरे यांनी सांगितले. संबंधित प्रकरण कोणत्याही न्यायालयात प्रलंबित नव्हते. ते केवळ पोलीस ठाण्याच्या स्तरावर चर्चेत आले होते आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार तेथेच निकाली काढण्यात आले होते.

 

या प्रकरणात आजपर्यंत कोणतेही समन्स, एफआयआर किंवा न्यायालयीन नोटीस मिळालेली नाही. त्यामुळे कोणतीही माहिती लपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे चांदेरे यांनी स्पष्ट केले. “न्यायालयाने ‘कॉग़्निझन्स’ घेतल्याची कोणतीही अधिकृत माहिती आम्हाला मिळालेली नव्हती. अचानक ऑनलाइन नोंदी दाखवून निवडणूक काळात याचिका दाखल करणे ही नियोजनबद्ध राजकीय कुरघोडी आहे,” असेही त्यांनी सांगितले.

 

निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर लढा देण्याऐवजी कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करून उमेदवाराची बदनामी करणे, हे भाजपच्या हताश राजकारणाचे प्रतीक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. बाबुराव चांदेरे यांना न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालय योग्य निर्णय देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारांना आवाहन केले आहे की त्यांनी अफवा, खोटे आरोप आणि राजकीय स्टंटला बळी न पडता, विकासकामे, प्रामाणिक नेतृत्व आणि विश्वासार्ह उमेदवार यांवर आधारित मतदान करावे.

 

 

“संबंधित प्रकरणात कुठलीही लपवालपवी केलेली नाही. शपथपत्रात पूर्ण पारदर्शकता ठेवली आहे. विरोधक फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी खोटे आरोप करत आहेत. माझा भर जनतेची प्रामाणिक सेवा करण्यावर आहे. जनतेचा विश्वास आणि विकासाचे काम हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.”
बाबुराव दत्तोबा चांदेरे, अधिकृत उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रभाग ९

 

Local ad 1