...

ईव्हीएम छेडछाडीचा आरोप; 24 तासांचे सीसीटीव्ही फुटेज द्या – प्रशांत जगताप

prashant jagtap pune election। पुणे : राज्य निवडणूक आयोग भाजप आणि सत्तारुढ पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे वानवडी प्रभागातील उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला आहे. आयोगाने निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने काम करावे, हीच आमची माफक अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी वानवडी प्रभागात दाखल झालेल्या ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड करण्यात येत होती, असा गंभीर आरोप जगताप यांनी केला आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान ईव्हीएमशी संबंधित कोणतीही कार्यवाही करताना त्या ठिकाणच्या सर्व राजकीय पक्षांना व उमेदवारांना पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. मात्र, कोणतीही सूचना न देता ईव्हीएम मशीनची प्राथमिक तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (evm tampering allegation prashant jagtap pune election)

 

Pune Municipal Election 2025 । पुणे महापालिकेत भाजप–शिवसेना युती धूसर, अर्ज माघारीपूर्वीही तोडगा नाही

 

या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी, तसेच गेल्या 24 तासांतील स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगासह सत्तारुढ भाजपवर थेट आरोप केले. त्यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची अधिकृत पुस्तिका असून, त्यामध्ये ईव्हीएम दाखल झाल्यानंतर कोणती प्रक्रिया राबवायची याबाबत स्पष्ट नियम दिलेले आहेत.

ईव्हीएम मशीन दाखल झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच त्या प्रभागातील उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मशीन सीलबंद आहेत की नाही, याची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्या मशीन स्ट्राँग रूम मध्ये ठेवण्यात येतात.

सूचना न देता तपासणीचा आरोप

जगताप म्हणाले की, वानवडी प्रभागात ईव्हीएम मशीन दाखल झाल्याची किंवा त्यांच्या तपासणीची कोणतीही सूचना उमेदवारांना देण्यात आली नाही. निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांसमोर किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोरच स्ट्राँग रूम, सील आणि सीसीटीव्ही यांची तपासणी होणे अपेक्षित असते. असे असतानाही गुरुवारी सकाळी वानवडी येथील स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन मोकळ्या करण्याचे काम सुरू होते, असा दावा त्यांनी केला. यासंबंधीचे सर्व पुरावे माझ्याकडे असून, याबाबत राज्य निवडणूक आयोग तसेच पुणे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल केली असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले.

प्रश्नोत्तर (FAQ)
प्र. वानवडी प्रभागात नेमका कोणता आरोप करण्यात आला आहे?
उ. वानवडी प्रभागात ईव्हीएम मशीन सोबत छेडछाड करण्यात येत होती, असा आरोप काँग्रेस उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला आहे.

प्र. प्रशांत जगताप यांनी कोणती मागणी केली आहे?
उ. गेल्या 24 तासांतील स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याची आणि तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

प्र. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार काय प्रक्रिया असते?
उ. ईव्हीएम दाखल झाल्यानंतर सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांच्या उपस्थितीत मशीनची तपासणी, सील पडताळणी आणि सीसीटीव्ही निरीक्षण करणे बंधनकारक आहे.

प्र. या प्रकरणी तक्रार कुठे दाखल करण्यात आली आहे?
उ. राज्य निवडणूक आयोग आणि पुणे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Local ad 1