...

PMC–PCMC निकालानंतर भाजपसोबत जाणार राष्ट्रवादी? तटकरे यांचा खुलासा  

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असले, तरी निकालानंतर दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र येण्याची दाट शक्यता असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अर्ज भरतानाचं वातावरण आणि आताचं वातावरण पूर्ण बदलले आहे. त्यामुळे निकाल काय लागतो, त्यावर पुढील निर्णय घेतला जाईल.” या पत्रकार परिषदेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि शहराध्यक्ष प्रदीप देशमुख उपस्थित होते.

 

महायुती प्रत्यक्षात का तुटली?

भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी महापालिकेत महायुती म्हणून लढण्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात तिन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. विशेष म्हणजे अजित पवार गटाने काही ठिकाणी शरद पवार गटाशीही आघाडी केली आहे. यावर तटकरे म्हणाले की, “निवडणूक लढवणे हे राजकीय कौशल्य आहे आणि ते अजित पवार यांच्याकडे आहे.”

 

भाजपसोबत जाण्याचा इतिहास

तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजपसोबतच्या आधीच्या राजकीय समीकरणांचा उल्लेख करत सांगितले, २०१४ मध्ये भाजपला बाहेरून पाठिंबा, २०१६-१७ मध्ये सत्ता स्थापनेच्या चर्चा, २०१९ मध्ये अजित पवार यांचा शपथविधी, २०२२ मध्ये एकनाथ शिंदे भाजपसोबत, ४३ आमदारांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय, “आम्ही २०२९ पर्यंत भाजपसोबत राहणार आहोत,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

 

राष्ट्रवादी विलीनीकरणावर भाष्य

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलीनीकरणाबाबत तटकरे म्हणाले, “तो निर्णय शरद पवार यांच्या गटाने घ्यावा. काळानुसार त्या विषयावर चर्चा होईल.”

 

 

 

प्रश्नोत्तरे

Q1. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती होणार आहे का?

👉 निकालानंतर सत्तेसाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युती होण्याचे स्पष्ट संकेत सुनील तटकरे यांनी दिले आहेत.

 

Q2. सध्या भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत का?

👉 नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.

 

Q3. अजित पवार गट शरद पवार गटासोबत का आहे?

👉 काही ठिकाणी स्थानिक राजकीय गणितामुळे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र लढत आहेत.

 

Q4. भाजपसोबत राष्ट्रवादी किती काळ राहणार?

👉 तटकरे यांच्या मते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) २०२९ पर्यंत भाजपसोबत राहणार आहे.

 

Q5. काँग्रेसवर तटकरे यांनी काय म्हटले?

👉 काँग्रेस हा शक्तीहीन पक्ष बनला असून त्यांची टीका केवळ अस्तित्वासाठी असल्याचे त्यांनी म्हटले.

Local ad 1