बारामतीत पुन्हा विमान कोसळले ; गोजुबावी परिसरात अपघात, वैमानिक सुरक्षित

रेडबर्ड कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची घटना

 

बारामती : बारामती तालुक्यात पुन्हा एकदा शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील गोजुबावी गावच्या हद्दीत आज रेडबर्ड कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

 

Maharashtra Officials Denmark Visit। पंतप्रधानांचा ‘स्वदेशी’चा नारा, अन् अधिकाऱ्यांची परदेशवारीची तयारी

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उड्डाण प्रशिक्षणादरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

 

या अपघातात वैमानिक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. बारामती परिसरात यापूर्वीही शिकाऊ विमानांच्या अपघाताच्या घटना घडल्या असल्याने पुन्हा एकदा विमान प्रशिक्षण सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

 

 

 

 

Local ad 1