पुणे : पुणे महापालिकेची सत्ता ज्यांच्या हातात होती, त्यांनी मागील नऊ वर्षांत तब्बल ७५ हजार कोटी रुपयांचा खर्च केल्याचे सांगितले जाते. मात्र शहरात ठोस विकासकामे दिसून येत नाहीत. मग हा निधी नेमका गेला कुठे? असा थेट सवाल उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना केला आहे. भवानीपेठ येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, जगातील ५०० शहरांचा अभ्यास करण्यात आला असता वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा जगात चौथा क्रमांक लागतो. पुण्याची सत्ता ज्यांच्या हातात दिली, त्यांच्या अपयशी कारभाराचे हे स्पष्ट प्रतिबिंब असल्याची टीका त्यांनी केली. शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. अनेक भागांत नागरिकांना पिण्याचे पाणीही मिळत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. (ajit pawar question 75000 crore pune municipal corporation)
“सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटावर चव्हाणची जोरदार टीका”
“मी शब्दाचा पक्का आहे, पुराव्याशिवाय बोलत नाही”
महापालिकेतील सफाई व्यवस्थेवरही अजित पवार यांनी गंभीर आरोप केले. पुण्यात १२ हजार ३५० सफाई कर्मचारी असल्याचे कागदोपत्री दाखवले जाते. मात्र प्रत्यक्षात काही कर्मचाऱ्यांना फोन करून चौकशी केली असता, आम्ही पुण्यातच नाही, तर काहींनी सफाईचे काम करत नसल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला.
बोगस नावे दाखवून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली असून, मी नेहमीच पुराव्यांवरच बोलतो, असे स्पष्ट करत बदल केल्याशिवाय पर्याय नाही, असा ठाम इशारा अजित पवार यांनी दिला.
महापालिका निवडणूक जवळ! पुण्यात कुठे किती मतदान केंद्रे? सविस्तर वाचा
प्रश्न–उत्तर (FAQ)
प्रश्न 1 : अजित पवार यांनी पुणे महापालिकेबाबत काय आरोप केले?
उत्तर : पुणे महापालिकेने ९ वर्षांत ७५ हजार कोटी रुपये खर्च केले, मात्र ठोस विकास दिसत नाही, असा आरोप अजित पवार यांनी केला.
प्रश्न 2 : पुण्याचा वाहतूक कोंडीमध्ये कितवा क्रमांक असल्याचे सांगितले?
उत्तर : जगातील ५०० शहरांच्या अभ्यासात वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा चौथा क्रमांक असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
प्रश्न 3 : सफाई कर्मचाऱ्यांबाबत कोणता दावा करण्यात आला?
उत्तर : कागदोपत्री दाखवलेले काही सफाई कर्मचारी प्रत्यक्षात काम करत नसल्याचा दावा करत बोगस नावे दाखवून कोट्यवधींची लूट झाल्याचा आरोप करण्यात आला.
प्रश्न 4 : अजित पवार यांनी काय इशारा दिला?
उत्तर : पुराव्यांवरच बोलतो आणि परिस्थिती सुधारण्यासाठी बदल केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा त्यांनी दिला.

