...

Pune ACB raid : उपविभागीय अधिकाऱ्याला 2 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले !

Pune ACB raid पुणे : पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) उपविभागीय अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे. नवीन इमारतीच्या अंशत: पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर तडजोडीअंती 2 लाख रुपये स्वीकारताना ही धडक कारवाई करण्यात आली. मंचर येथील उपविभागीय कार्यालयातच झालेल्या या सापळा कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (pune acb trap govind shinde bribe case manchar)

 

आरोपी अधिकाऱ्याचे नाव गोविंद पंढरीनाथ शिंदे (वय 46) असे असून ते जुन्नर-आंबेगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पेट्रोल, डिझेलची कमी नाही, तरीही रांगा ! पुण्यात ‘पेमेंट पॉलिसी’मुळे गोंधळ !

 

मागणी पाच लाखाची डील दोन लाखात !
तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी पुणे-नाशिक महामार्गालगत नारायणगाव येथे जॉइंट व्हेंचरमध्ये इमारत उभारली आहे. सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अंशत: पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रस्तावावर कारवाई करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने थेट 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तक्रारदाराने ACBकडे तक्रार केली. पडताळणीत लाच मागणी स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला.

 

मंचर कार्यालयात थरार ! नोटा स्वीकारताच जाळ्यात
शुक्रवारी ACBने सापळा रचून मंचर येथील कार्यालयातच आरोपीला 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यालयातच घडलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे.

 

 

 

 

 

Local ad 1