पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, अवघे सहा दिवस शिल्लक असताना पालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.या निवडणुकीसाठी शहरात ४ हजार ११ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, त्यासाठी १३ हजार ८६२ मतदान यंत्रे (बॅलेट युनिट) आणि ५ हजार ३२१ कंट्रोल युनिट्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. (pune municipal corporation election voting preparation 2026)
“सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटावर चव्हाणची जोरदार टीका”
प्रभागनिहाय मतदान केंद्रे
सर्वाधिक मतदान केंद्रे : प्रभाग क्र. ९ (बाणेर–बालेवाडी–पाषाण) – १७४
सर्वांत कमी मतदान केंद्रे : प्रभाग क्र. ३९ (अपर सुपर इंदिरानगर) – ६८
जागा व उमेदवारांची माहिती
* एकूण प्रभाग : ४१
* एकूण जागा : १६५
* चार सदस्यीय प्रभाग : ४०
* पाच सदस्यीय प्रभाग : १ (प्रभाग क्र. ३८)
* रिंगणात उमेदवार : १,१५५
* अपक्ष उमेदवार : २७७
* प्रभाग क्र. ३५ मधील मंजुषा नागपुरे व श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड
➡️ त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक १६३ जागांसाठी
पुण्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व हरपले । Suresh Kalmadi Passed Away
कर्मचारी व वाहतूक व्यवस्था
* निवडणूक कर्मचारी : २३,५००
प्रत्येक मतदान केंद्रावर
* १ केंद्राध्यक्ष
* ३ मतदान अधिकारी
* १ शिपाई
* साहित्य किट : ६,५००
* वाहने : १,०५१ (PMPMML बसेससह)
निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान
निवडणूक कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ही प्रक्रिया सध्या सुरू आहे.
दुबार मतदान रोखण्यासाठी विशेष उपाय
शहरात ३ लाख ४४६ दुबार मतदार नावे असल्याचे आढळून आले आहे. अशा मतदारांच्या घरी जाऊन पालिका कर्मचारी अर्ज भरून घेत असून, एका ठिकाणी मतदान केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी मतदान होऊ नये म्हणून संबंधित ठिकाणी “मतदान केले” असा शिक्का मारला जाणार आहे.
मतदान यंत्र सीलिंगला सुरुवात
निवडणुकीसाठी उपलब्ध १३,५०० बॅलेट युनिट्स पैकी काही ठिकाणी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर मतपत्रिका सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्रे
मतमोजणी होणार या १५ ठिकाणी सारसबागेशेजारील, कै. बाबुराव सणस क्रीडांगण, वडगाव बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार अकॅडमी ऑफ ए लर्निंग स्कूल, टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल, धनकवडी – सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रांगणातील बंदिस्त पत्रा शेड, शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय मैदान, कात्रजमधील गोकुळनगर हेमी पार्कजवळील छत्रपती संभाजी महाराज ई लर्निंग स्कूल, वानवडीतील जिजाऊ मंगल कार्यालय, हडपसरमधील माळवाडी येथील साधना विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे कर्मवीर सभागृह, खराडी येथील कै. राजाराम भिकू पठारे, बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलमधील बॅडमिटंन हॉल, कोथरूडमधील एमआयटीमधील द्रोणाचार्य बिल्डिंग पहिला मजला, भवानी पेठेतील रफी अहमद किदवाई उर्दु माध्यमिक व उच्च माध्यमिक विघालय, पौडफाटा येथील पंडित दिनदयाळ उपाध्याय इंग्रजी शाळा, कोरेगाव पार्कमधील मौलाना अब्दुल कलाम स्मारक, नगररोड – वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय.
एकूण मतदारसंख्या
एकूण मतदार : ३५,५१,८५४
* पुरुष : १८,३२,४४९
* महिला : १७,१९,०१७
* इतर : ४८८
* अनुसूचित जाती : ४,६८,६३३
* अनुसूचित जमाती : ४०,६८७
* दुबार मतदार नावे : ३,४४६
प्रश्न – उत्तर (FAQ)
प्र. पुणे महापालिका निवडणुकीचे मतदान कधी आहे?
उ. १५ जानेवारी रोजी पुणे महापालिका निवडणुकीचे मतदान होणार आहे.
प्र. पुण्यात किती मतदान केंद्रे आहेत
उ. पुणे शहरात एकूण ४ हजार ११ मतदान केंद्रे आहेत.
प्र. एकूण किती मतदान यंत्रे वापरण्यात येणार आहेत?
उ. १३ हजार ८६२ बॅलेट युनिट्स आणि ५ हजार ३२१ कंट्रोल युनिट्स वापरली जाणार आहेत.
प्र. मतमोजणी कधी व कुठे होणार आहे?
उ. १६ जानेवारी रोजी शहरातील १५ ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
प्र. दुबार मतदान कसे रोखले जाणार आहे?
उ. दुबार मतदारांच्या घरी जाऊन अर्ज घेतले जात असून, एका ठिकाणी मतदान केल्यावर दुसऱ्या ठिकाणी शिक्का मारला जाणार आहे.

