पुणे राष्ट्रवादी शहर उपाध्यक्षपदी जुबेर बाबू शेख

पुणे : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी जुबेर बाबु शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. (Pune Nationalist City Vice President Zubair Babu Sheikh)

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आपल्या पक्षाची विचारधारा व तत्त्वाचे केंद्रस्थानी ठेवून पक्षाच्या विस्तारार्थ आणि संघटना वाढवण्यासाठी जुबेर शेख यांची निवड करण्यात आली. जुबेर बाबू शेख हे शहर चिटणीस म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरी पाहून त्यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे शहरातील झोपडपट्टी भागात जुबेर बाबू शेख यांची कार्य असून, त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहे. (Pune Nationalist City Vice President Zubair Babu Sheikh)

 

 

पक्षाने दिलेली जबाबदारी आणि टाकलेला विश्वास पात्र ठेवण्याचा प्रयत्न करू. पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे शेख यांनी सांगितले. (Pune Nationalist City Vice President Zubair Babu Sheikh)

 

 

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा अध्यक्ष किशोर कांबळे, अन्वर खान, शब्बीर बागवान, इस्माईल छप्परबंद, असलम बागवान, इम्रान बागवान, फारुक शेख उपस्थित होते.

 

Local ad 1