बावधनमधील उच्चभ्रु सोसायटीत उच्च प्रतीच्या मद्याची बेकायदा विक्री
पुणे : मुळशी तालुक्यातील बावधन येथील एका उच्चभ्रु सोसायटीत बेकायदा हरियाणा राज्यात विक्रीची परवानगी असलेले उच्च प्रतीची दारु (For Sale In Haryana) (स्कॉच) विक्री केली जात होती. याठिकाणी उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात दोन लाख 17 हजार रुपयांचा दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली. (Illegal sale of high quality liquor from elite society in Bavdhan)
सिद्धांत प्रशांत मेहता (वय २४ वर्षे) बावधन, ता. मुळशी, जि. पूणे यांच्या राहत्या घरात परराज्यातील अवैध स्कॉचचा साठा मिळून आला सदर ठिकाणी विविध ब्रेन्डच्या ७५० मि. लि. क्षमतेच्या ५० बाटल्या तसेच १००० मि. लि. क्षमतेच्या ५ बाटल्या असा एकूण रुपये २ लाख १७ हजार ४३५ रुपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आल्याने त्यास अटक करून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (AXE), १०८ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ०५/२०२३ दिनांक १३/०१/२०२३ गुन्हा नोंद केला. (Illegal sale of high quality liquor from elite society in Bavdhan)
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, डी विभाग, पुणे या पथकाती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणसिंग रजपूत, उपआधीक्षक एस.आर.पाटील, वाय, एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. (Illegal sale of high quality liquor from elite society in Bavdhan)
कारवाईत निरीक्षक तानाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक योगेंद्र लोळे, दिपक सुपे, गणेश केंद्रे, वर्षा घोडे, स.दु.नि. सागर धर्व व जवान संजय गोरे, राजू पोटे, महेश बनसोडे, तात्या शिंदे, समीर पडवळ, समीर बिरांजे, इत्यादींनी सदर कारवाईत भाग घेतला. (Illegal sale of high quality liquor from elite society in Bavdhan)