भाजप पुणे शहराच्या शासकीय योजना प्रमुखपदी गणेश शेरला

 

पुणे : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेली तीन दशके सक्रियपणे कार्यरत असलेले एकता सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांची भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर संघटनेच्या ‘शासकीय योजना प्रमुख’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

 

गणेश शेरला यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध स्तरांवर कार्य केले आहे. एकता सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, भाजप झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष, पर्वती विभागाचे उपाध्यक्ष तसेच पक्षातील विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

 

त्यांच्या सामाजिक आणि राजकीय अनुभवाचा लाभ पुणे शहरातील भाजप संघटन अधिक बळकट करण्यासाठी होईल, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

 

यावेळी पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे यांनी ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराने प्रेरित होऊन पक्षाने सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी आणि भारतीय जनता पक्षाचा विचार अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचवावा, अशा शुभेच्छा गणेश शेरला यांना दिल्या.

 

 

 

 

Local ad 1