Shivraj Rakshe Maharashtra Kesari। शिवराज राक्षे बनला महाराष्ट्र केसरी

Shivraj Rakshe Maharashtra Kesari । पुणे : पुणे जिल्ह्यातील मूळचा राजगुरूनगर येथील रहिवासी आणि नांदेड संघातून खेळलेल्या शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) मंगळवेढा, सोलापूरचा महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) चितपट करीत  65 व्या महाराष्ट्र केसरीचा ‘किताब ( Maharashtra Kesari) पटकावला. त्यामुळे महेंद्र गायकवाडला उपमहाराष्ट्र केसरीवर समाधान मानावे लागले. (Shivraj Rakshe Maharashtra Kesari)

 

उत्कंठा निर्माण करणाऱ्या-लढतीत शिवराज राक्षे ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचा मानकरी ठरला. नांदेडकडून खेळणाऱ्या राक्षे यांने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला चितपट केले. चांदीची गदा, पाच लाख रुपये रोख आणि महिंद्रा कंपनीची थार गाडी भेट म्हणून देण्यात आली. उपविजेत्या महेंद्र गायकवाडला अडीच लाख रुपये रोख आणि धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून चांदीची गदा देण्यात आली. (Shivraj Rakshe Maharashtra Kesari)

  माती विभागातील अंतिम फेरीत महेंद्र गायकवाडने सोलापूरच्या सिकंदर शेखचा अटीतटीच्या लढतीत ६ विरुद्ध ४ गुणांनी पराभव केला. गादी विभागात २०२० सालचा महाराष्ट्र केसरी नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि नांदेडचा शिवराज राक्षे यांच्यात अंतिम लढत झाली. यात राक्षे ८ विरुद्ध १ गुणांनी विजय मिळवित सदगीरला धक्का दिला. (Shivraj Rakshe Maharashtra Kesari)

Local ad 1