FIFA World Cup 2026 Final : फिफा विश्वचषक अंतिम सामन्यासाठी हॉटेल्स पहाटे २.३० पर्यंत सुरू ठेवा !

 FIFA World Cup 2026 Final मुंबई : फिफा विश्वचषक 2026 Final च्या अंतिम फेरीतील नॉकआउट सामन्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारक हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि इतर हॉस्पिटॅलिटी आस्थापनांना १९ जुलै रोजी पहाटे २.३० वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) – मुंबई चॅप्टरने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्क आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले आहे.  

 

 

फिफा विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने फुटबॉल प्रेमी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्लबमध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परवानाधारक आस्थापनांना अतिरिक्त वेळ व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना सुरक्षित, नियंत्रित आणि व्यावसायिक वातावरणात सामने पाहण्याची सुविधा मिळेल. त्याचबरोबर अनधिकृत ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासही मदत होईल.

 

 

या निर्णयामुळे राज्यातील हॉस्पिटॅलिटी उद्योगाला आर्थिक चालना मिळेल, रोजगारनिर्मितीला हातभार लागेल, तसेच पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल, असा दावा संघटनेने केला आहे. रात्रीच्या अर्थचक्राला गती मिळण्याबरोबरच मुंबईची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या सार्वजनिक प्रक्षेपणासाठी सक्षम आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख अधिक बळकट होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

 

विशेष परवानगी मिळाल्यास सर्व परवानाधारक आस्थापने उत्पादन शुल्क विभाग, पोलीस, महापालिका आणि अग्निशमन विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करतील, असे आश्वासन एनआरएआयने दिले आहे. तसेच पुरेशी सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सकारात्मक निर्णय घेऊन १९ जुलै रोजी पहाटे २.३० वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास विशेष परवानगी द्यावी, अशी विनंती एनआरएआय मुंबई चॅप्टरच्या अध्यक्षा रेचल गोएंका यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

 

फिफा विश्वचषक 2026 Final : हॉटेल्स पहाटे २.३० पर्यंत सुरू ठेवण्याची एनआरएआयची मागणी

 

 

फिफा विश्वचषक 2026 अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबना १९ जुलै रोजी पहाटे २.३० पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी एनआरएआयने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली आहे.

 

 

 

FIFA World Cup 2026 Final,

NRAI Mumbai,

Hotel Timing Maharashtra,

Maharashtra Excise Department,

Restaurants Open Till 2.30 AM,

FIFA Final Screening,

फिफा विश्वचषक अंतिम सामना,

एनआरएआय,

राज्य उत्पादन शुल्क विभाग

 

fifa-world-cup-2026-final-hotels-open-till-2

-30-am-demand-nrai-maharashtra

Local ad 1