...

भाजपाचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’; निवडणूक कचेरीत गजबजाट !

 

पुणे : मतदार यादीचे बारकाईने वाचन, मतदारांना स्लिप वितरण, तसेच घरोघरी प्रचाराची सखोल तयारी अशा निवडणूक वातावरणामुळे प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपाच्या निवडणूक कचेरीत मोठी गजबजाट पाहायला मिळत आहे. तळागाळात मजबूत संघटनात्मक जाळे असलेल्या भारतीय जनता पक्षाने या प्रभागात मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार केला आहे. प्रभाग २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई या भागातून भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र (बाप्पू) मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे निवडणूक रिंगणात आहेत. (prabhag 25 bjp micro management pune election)

 

 

पुण्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व हरपले । Suresh Kalmadi Passed Away

या संदर्भात कसबा विधानसभा अध्यक्ष अमित कंक यांनी सांगितले की, “आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभाग २५ मध्ये निवडणूक लढवत आहोत. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून, भाजपाने नेहमीच निवडणूक गांभीर्याने लढवली आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून उभी राहिलेली मजबूत संघटना, निवडणुकीचे प्रभावी मायक्रो मॅनेजमेंट आणि विकासकामे घराघरात पोहोचवणारे कार्यकर्ते यांच्या जोरावर आम्ही मोठ्या विजयाचा निर्धार केला आहे.”

 

या निवडणुकीसाठी प्रभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने काम करत असून त्यामध्ये मनोज खत्री, किरण जगदाळे, निलेश कदम, संतोष फडतरे, मनीष जाधव, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, प्रणव गंजीवाले, अनंत कुंटे, धनंजय डिंबळे, अजित सुकादने, योगिता गोगावले, रुपाली कदम, दिलीप पवार, सोहम भोसले, आदेश पारवे, अमित सोनवणे, अनिल पवार, बिपीन बोरावके, श्रेयस लेले यांच्यासह सर्व हजारी भाग प्रमुख व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

 

 

 

 

 

Local ad 1