...

अवघ्या ३ दिवसांत मंडई उजळली ! बाप्पु मानकरांनी काय केलं पाहा

 

पुणे : पुण्याच्या मध्यवस्तीतील ऐतिहासिक महात्मा फुले मंडईत अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व्यापारी आणि नागरिकांना होत असलेली गैरसोय अवघ्या तीन दिवसांत दूर करण्यात आली आहे. नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी केलेल्या पाहणीनंतर मंडई परिसरात नवे विद्युत दिवे बसवण्यात आले असून, त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ उजळली आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (mahatma phule mandai new light arrangement raghavendra bappu mankar)

 

पुण्याची 10वी महिला महापौर कोण ? भाजपमधील ‘या’ नावामुळे राजकीय वर्तुळात खळबळ !

 

 

१३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई ही पुण्याची प्रमुख बाजारपेठ आहे. काही दिवसांपूर्वी येथे सायंकाळच्या वेळी प्रकाशअभावी सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याची बाब व्यापाऱ्यांनी नगरसेवक मानकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. अनेक विद्युत दिवे नादुरुस्त झाले होते, तर काहींची प्रकाशक्षमता कमी झाली होती.

 

या समस्येची दखल घेत तातडीने नवीन दिवे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले. अवघ्या तीन दिवसांत हे काम पूर्ण झाले असून, सुमारे ५० नवे विद्युत दिवे बसवण्यात आले आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर मानकर यांनी आज मंडई परिसराला भेट देऊन पाहणी केली.

 

रिअल इस्टेटमध्ये मोठी झेप ! पुणेकरांनी केली ‘इतक्या’ हजार कोटींची घरखरेदी। Pune Housing Report 2025

 

यावेळी राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले, “व्यापारी आणि नागरिकांना भेडसावणारी ही तातडीची समस्या लक्षात घेऊन त्वरित काम सुरू करण्यात आले. सध्या आवश्यक त्या ठिकाणी नवीन दिवे बसवले असून, लवकरच संपूर्ण मंडई परिसरातील विद्युत व्यवस्थेचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येईल.” व्यापाऱ्यांनीही समाधान व्यक्त करत सांगितले की, “अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. ही बाब लक्षात येताच बाप्पु मानकर यांनी तत्काळ उपाययोजना केल्या. कमी कालावधीत काम पूर्ण झाल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”

 

 

 

Local ad 1