पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉक व व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधला. (bappu mankar walking track exercise)
राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि व्यायामप्रेमी नागरिकांसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याचे, तसेच व्यायामासाठी आवश्यक साहित्य आणि प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपाचे अधिकृत उमेदवार बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांनी वर्तक बाग, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, सारस बाग, महाराणा प्रताप उद्यान आणि साठे उद्यान येथे नागरिकांशी संवाद साधला.
बाप्पु मानकर यांनी सांगितले, “आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. प्रभागातील नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम करणार आहोत.” यावेळी मा. नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, मतदार संघ अध्यक्ष अमित कंक, बिपिन बोरावके, मनीष जाधव, किरण जगदाळे, कुणाल आहेर, धनंजय डिंबळे आणि भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

