Related Posts
दरम्यान, सीबीएसई बारावीसाठी देशभरातील 7 हजार 330 परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा झाली. यावषीच्याझ बारावी परीक्षेसाठी 17 लाख 4 हजार 367 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 16 लाख 92 हजार 794 विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यापैकी 14 लाख 96 हजार 307 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाचा निकाल ९०.९३ टक्केा लागला आहे. महाराष्ट्रात यंदा राज्या तून ३४ हजार ७०३ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षा दिली. त्या९पैकी ३१ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याहची उत्तीर्णतेची टक्के्वारी ९०.६८ इतकी आहे. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.७५ टक्केर, तर मुलाचे प्रमाण ८८.८९ इतके आहे, अशी माहिती सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आली.
बारावीचा विभागनिहाय निकालात देशात विजयवाडा विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून, त्यासची उत्तीर्णतेची टक्केहवारी ९९.६० इतकी आहे. त्या खालोखाल त्रिवेंद्रम विभागातील उत्तीर्णांचे प्रमाण हे ९९.३२ टक्के, चेन्नई विभागाचा ९७.३९ टक्के निकाल लागला. प्रयागराज विभागात सर्वांत कमी ७९.५३ टक्के उत्तीर्णांचे प्रमाण आहे. दहावीच्या विभागनिहाय निकालात विजयवाडा आणि त्रिवेंद्रम विभागांत उत्तीर्णांचे प्रमाण हे प्रत्येकी ९९.७९ टक्के आहे. त्या खालोखाल बेंगळुरू विभागात उत्तीर्णांचे प्रमाण ९८.९० टक्के, चेन्नई विभागात ९८.७१ टक्के, तर गुवाहाटी विभागातील उत्तीर्णांचे प्रमाण हे सर्वांत कमी ८४.१४ टक्के लागला.
https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

