शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, तुमच्या जिल्ह्याचा निकाल जाणून घ्या

पुणे : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक परीक्षेचा (इ.8 वी ) अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. त्यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल 22.16 टक्के तर पूर्व माध्यमिक परीक्षेचा निकाल 15.60 टक्के लागला आहे. (Scholarship Exam Result Declared, Know Your District Result)

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिपदेमार्फत दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी), शासरकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहिर करण्यात आला आहे. httpsi/wwwmseepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार आहे.

 

शाळांना आपल्या विद्याथ्योंचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. www.mscepune.in  विद्याथ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. २९/०४/२०२३ ते ०१/०५/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणाच्या पड़ताळणोसाठी प्रत्येक पेपर करिता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
विद्याथ्याच नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये  दुरूस्तीसाटी दि. ०९/०५/२०२३ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाटविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहितमुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळठणीच निर्णय संबंधितशाळेच्या लॉंगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपयैत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अरज निकाली काढल्यांतर अतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

संपूर्ण निकाल पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

file:///C:/Users/admin/Downloads/2023-INTERIM-RESULT-ALL-1.pdf

नुकतेच अंतरिम निकाल प्रकाशित केले असून त्यात असे दिसून आले आहे की, इयत्ता 5 वी आणि 8 वी या दोन्ही वर्गात पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात इयत्ता 5 वी चे एक लाख 13 हजार 938 तर पूर्व माध्यमिक परीक्षेत 55 हजार 557 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. (Scholarship Exam Result Declared, Know Your District Result)

Local ad 1