राज्याचे दहावीचं निकाल जाहीर; 94.10 टक्के : निकाल पाहणयासाठी क्लिक करा
दहावीत ही कोकांत विभाग पहिला ; मुलींनी दहावीत ही आघाडीवर
पुणे. परिक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन निकालाची वैशिष्य सांगितली. राज्यातील नऊ विभागात परीक्षा घेण्यात आली. त्यात 94.10 टक्के निकाल लागला आहे. (10th result declared ; 94.10 percent) यंदा दहा दिवस परीक्षा आधी घेण्यात आली त्यामुळे निकाल लवकर जाहिर करण्यात आला आहे. परीक्षा काळात कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथक आणि बैठे पथक तैनात करण्यात आले होते.
दहावी निकाल 94.10 टक्के
विभागनिहाय निकाल
कोकण: ९८.८२ टक्के
कोल्हापूर: ९६.८७ टक्के
मुंबई: ९५.८४ टक्के
पुणे: ९४.८१ टक्के
नाशिक : ९३.४ टक्के
अमरावती: ९२.९५ टक्के
छत्रपती संभाजी नगर: ९२.८२ टक्के
लातूर : ९२.७७ टक्के
नागपूर : ९०.७८ टक्के