पुणे | प्रतिनिधी
‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ अंतर्गत पहिल्या टप्प्याचे आयोजन मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले असून या टप्प्याला दुपारी १.३० वाजता टी.सी.एस सर्कल, हिंजवडी (फेज-३) येथून सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा समारोप डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास होईल. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासह मुळशी व मावळ तालुक्यातील संपूर्ण स्पर्धा मार्गाची सखोल पाहणी प्रशासनाने केली आहे. या टप्प्यातील एकूण अंतर ९१.८ किलोमीटर असून या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटनस्थळे जागतिक नकाशावर आणणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. (bajaj pune grand tour 2026 stage 1 hinjewadi akurdi)
📍 स्पर्धा मार्ग
टी.सी.एस सर्कल, हिंजवडी → माण → अंबवडे गाव कमान → पौड → चाले → नांदगाव → कोळवण → हडशी लेक → जावण → तिकोना पेठ → काले → कडधे → थुगाव → शिवणे → डोणे → सावळे चौक → आढळे बुद्रुक → बेबडओहळ → चंदनवाडी → चांदखेड → कासारसाई → नेरे → मारुंजी → लक्ष्मी चौक → भूमकर चौक → डांगे चौक → श्री संत नामदेव महाराज चौक → डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी. स्पर्धा कालावधीत वाहतूक वळविण्यात येणार असून काही मार्ग तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
व्हिडिओ : बहादूर सुरक्षा रक्षकाची उडी ; खडकवासला धरणात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचले
❓ प्रश्न–उत्तर
❓ बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा पहिला टप्पा कधी होणार?
👉 मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी.
❓ स्पर्धेची सुरुवात आणि समारोप कुठे आहे?
👉 सुरुवात टी.सी.एस सर्कल, हिंजवडी (फेज-३) येथून होणार असून समारोप डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी येथे होईल.
❓ पहिल्या टप्प्याचे एकूण अंतर किती आहे?
👉 एकूण अंतर ९१.८ किलोमीटर आहे.
❓ स्पर्धेमुळे वाहतुकीत बदल होणार आहेत का?
👉 होय. काही मार्गांवर वाहतूक वळविण्यात येणार असून काही रस्ते तात्पुरते बंद राहतील.
❓ या स्पर्धेचा उद्देश काय आहे?
👉 पर्यटनाला चालना देणे, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.

