...

औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू ; नगरसेवक सनी निम्हण यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (पीएमपीएमएल) तर्फे औंध ते डेक्कन जिमखाना दरम्यान धावणारी 105 क्रमांकाची बससेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही सेवा बंद असल्याने औंध-बाणेर परिसरातील नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती. नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांच्या पाठपुराव्यानंतर ही मागणी पूर्ण झाली आहे.

 

 

आज सकाळी सुमारे 8.15 वाजता पहिल्या बसचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

 

 

डीपी रोड परिसरात अनेक वर्षांपासून बंद असलेली ही बससेवा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही सेवा सकाळी 5.30 ते रात्री 8.15 पर्यंत सुरू राहणार असून दररोज आठ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे औंध-बाणेर ते डेक्कन परिसरातील प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

 

 

 

नगरसेवकांचा तिकीट काढून प्रवास 

पीएमपीएमएलच्या नवीन बस मार्गाच्या उद्घाटनावेळी सहसा नेते फक्त हिरवा झेंडा दाखवून निघून जातात. मात्र यावेळी नगरसेवक सनी निम्हण, संचालक अजय खेडेकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका भक्ती गायकवाड, सपना छाजेड आणि आनंद छाजेड यांनी तिकीट काढून पहिल्या फेरीत सामान्य नागरिकांसोबत प्रवास केला. त्यांच्या या कृतीचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

 

Local ad 1