...

औंध-बोपोडी प्रभागात ‘महापुरुषांना स्वच्छांजली’ मोहिमेचा शुभारंभ ; नगरसेवक सनी निम्हण यांचा पुढाकार

पुणे, १६ फेब्रुवारी २०२६ : “आदर्श घेऊन महापुरुषांचा, संकल्प करू स्वच्छतेचा” या घोषवाक्याखाली औंध-बोपोडी प्रभागात ‘महापुरुषांना स्वच्छांजली’ या अभिनव स्वच्छता मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक सनी निम्हण यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबवण्यात येत असून, ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत (१९ फेब्रुवारी ते १४ एप्रिल) चालणार आहे.

 

महापुरुषांच्या विचारांना कृतीची जोड देत परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संकल्प या मोहिमेद्वारे करण्यात आला आहे. केवळ अभिवादनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष स्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून येत आहे.
मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर आणि नगरसेविका सपना छाझेड उपस्थित होते. औंध क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छता कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामात सहभाग घेत मोहिमेला पाठिंबा दिला.
  • नागरिकांसाठी QR कोड सुविधा
ही मोहीम लोकचळवळ व्हावी, यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यात आला आहे. नागरिकांना आपल्या परिसरातील अस्वच्छ जागांची माहिती देण्यासाठी QR कोड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागरिकांनी काय करावे 
QR कोड स्कॅन करावा
संबंधित जागेचा फोटो व लोकेशन पाठवावे
प्राप्त तक्रारीनुसार तात्काळ स्वच्छता केली जाईल
तसेच 8308123555 या क्रमांकावरही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरसेवक सनी निम्हण म्हणाले, “आपल्या महापुरुषांनी समाजसेवा आणि शिस्तीचा आदर्श दिला आहे. त्यांना खरी आदरांजली वाहण्यासाठी ‘स्वच्छांजली’ मोहिम सुरू केली आहे. नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा.”
Local ad 1