महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेनेचे आत्मचिंतन; संघटन मजबूत करण्यावर भर
shiv sena pune municipal election defeat review meeting shinde faction
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर शिवसेना (शिंदे गट) आता आत्मचिंतनाच्या भूमिकेत दिसत आहे. निवडणूक स्वबळावर लढवूनही एकही नगरसेवक निवडून आणता न आल्याने पक्षांतर्गत गटबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुकुंदनगर येथे शिवसेनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. बैठकीपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यभर नव्याने संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली. ज्या भागात पक्ष कमकुवत आहे, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी बैठका घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. (shiv sena pune municipal election defeat review meeting shinde faction)
जनगणनेत ‘हिंदू लिंगायत’ नोंदीसाठी जनजागृती मोहीम : डॉ. विनय कोरे
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार शरद सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले की, पुढील तीन वर्षांत कोणत्याही निवडणुका नसल्यामुळे हा कालावधी संघटन मजबूत करण्यासाठी वापरला जात आहे. विधानसभा स्तरावर आढावा घेतला जात असून एसआयआर मॅपिंगही सुरू आहे. ग्रामीण भागात अडचणी कमी असल्या तरी शहरी भागात मतदार नोंदणीसंदर्भात काही अडचणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले असून त्यानंतर नगरपालिका निवडणुकांमध्ये 60 नगराध्यक्ष निवडून आले. मात्र, महापालिका निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे ज्या भागात अपयश आले, त्या ठिकाणी संघटन मजबूत करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
राज्यभर नव्याने नियुक्त केलेले संपर्क प्रमुख सध्या आपल्या-आपल्या भागात आढावा बैठका घेत आहेत. या बैठकीत पक्षाची सध्याची स्थिती, संघटन मजबुती, कार्यकर्त्यांना संधी आणि अंतर्गत मतभेद कमी करण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.

