PMC Election Results । “पुणे महापालिकेचा निकाल कुठे लागणार? 15 मतमोजणी केंद्रांची संपूर्ण यादी जाहीर”
पुणे | 15 जानेवारी 2026
PMC Election Results । पुणे महानगरपालिकेच्या 2025–26 सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (15 जानेवारी) शहरातील 4011 मतदान केंद्रांवर मतदान किरकोळ अपवाद वगळता अतिशय शांततामय वातावरणात पार पडले. आता पुण्याचा पुढील कारभार कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला उद्या, 16 जानेवारी रोजी होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता पुणे महापालिकेच्या 15 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांत मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, स्ट्राँगरूम आणि कर्मचारी तयारी पूर्ण असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.
Pune Municipal Election 2026 । ईव्हीएम बंद, शाई पुसली, बोगस मतदान! पुणे निवडणुकीत मोठा गोंधळ !
पुण्यातील 15 मतमोजणी केंद्रे
पुण्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी केंद्र निश्चित करण्यात आले आहे.यामध्ये प्रमुख केंद्रे अशी आहेत. खराडी येथील राजाराम पठारे स्टेडियम, शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय मैदान, म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, कोथरूड येथील MIT WPU, हडपसर येथील रयत शिक्षण संस्था, स्वारगेट येथील बाबुराव सणस क्रीडांगण, तसेच कात्रज–कोंढवा भागातील ई-लर्निंग स्कूल या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
व्हिडीओ : “मतदान करून बाहेर पडताच बोट पुसलं ! धायरीत शाई घोटाळा उघड”
कडक प्रवेश व्यवस्था
मतमोजणी केंद्रांवर तसेच स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंचातील मध्यवर्ती मीडिया सेलमध्ये प्रवेशासाठी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, पत्रकार आणि कॅमेरामन यांना वैध ओळखपत्र अनिवार्य असेल. अनधिकृत व्यक्तींना परिसरात प्रवेश नाकारला जाणार असून, पोलिस बंदोबस्त आणि ड्रोन व सीसीटीव्ही देखरेख ठेवण्यात आली आहे.
पुण्याच्या सत्तेचा फैसला उद्या
महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांमधील चुरशीच्या लढतीनंतर आता पुणे महापालिकेचा पुढील महापौर कोण होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
❓ पुणे महापालिका मतमोजणी कधी होणार आहे?
👉 पुणे महापालिकेची मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.
❓ पुण्यात किती ठिकाणी मतमोजणी होणार?
👉 पुण्यात एकूण 15 ठिकाणी स्वतंत्र मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
❓ मीडिया व पत्रकारांना प्रवेश मिळणार का?
👉 होय, मात्र फक्त वैध ओळखपत्र असलेल्या पत्रकारांनाच प्रवेश दिला जाईल.
❓ मध्यवर्ती मीडिया सेंटर कुठे आहे?
👉 गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे मध्यवर्ती मीडिया सेल आहे.
❓ मतमोजणी दरम्यान सुरक्षा कशी असेल?
👉 सर्व केंद्रांवर पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही आणि प्रवेश तपासणी करण्यात येणार आहे.

