...

व्हिडीओ : “मतदान करून बाहेर पडताच बोट पुसलं ! धायरीत शाई घोटाळा उघड”

 

पुणे, दि. १५ – पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक ३४ (नऱ्हे, वडगाव बुद्रुक, धायरी) येथील धायरी फाटा परिसरात मतदान प्रक्रियेवर संशय निर्माण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. नारायणराव सणस विद्यालयातील मतदान केंद्राबाहेर एका व्यक्तीने मतदानानंतर बोटावर लावलेली शाई लिक्विड (फिनर) वापरून पुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. (dhayari voting ink erased attempt pune)

 

 

सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मतदान करून बाहेर पडलेल्या त्या व्यक्तीच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित व्यक्तीला तात्काळ थांबवून त्याच्याकडील लिक्विड जप्त केले. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला रोखून धरल्यानंतर पोलिस व निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंगेश पोकळे यांनी सांगितले की, “मतदानानंतर लावली जाणारी शाई दोन ते तीन आठवडे न पुसता येणारी असते. ती दुबार मतदान टाळण्यासाठी वापरली जाते. तरीही ती लिक्विडने काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे गंभीर आहे. आम्ही याबाबत निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार करणार आहोत.”

शहरानंतर गावात लढाई ! जिल्हा परिषद निवडणूक तुमच्या जिल्हात होणार आहे का ? सविस्तर जाणून घ्या

 

महिला आय़ोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना घेऊन थेट भाजप उमेदवाराचे बुथ गाटत जाब विचारला. त्या ठिकाणच्या कार्याकर्त्यांनी कोण व्यक्ती होता माहित नाही, असे सांगत उडवा उडवीचे उत्तर देत होते. त्याचवेळी पोलिसांनी लिक्लिड ताब्यात घेतले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले.

 

 

 

 

 

Local ad 1