जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांच्याकडे अर्थ व नियोजन तसेच शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सहा विषय समित्यांच्या सभापतीपदांचे वाटप जाहीर केले. यावेळी तीन सभापतींना प्रत्येकी दोन विषय समित्यांची जबाबदारी देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, उर्वरित दोन विषय समित्यांसाठी दीपाली हुलावळे (मावळ, खडकाळे गट) आणि अमोल नलावडे (वेल्हे, विंझर गट) यांची बिनविरोध निवड झाली होती. या दोघांना कोणत्या समित्यांची जबाबदारी द्यायची, याचे अधिकार अध्यक्षांकडे असून त्यानुसार अंतिम वाटप करण्यात आले. याआधी दि. २ एप्रिल रोजी चार विषय समित्यांच्या सभापतींची निवड झाली होती. त्यामध्ये इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील-ठाकरे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी, तर हवेली तालुक्यातील जितेंद्र बडेकर यांची समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली होती.
https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

