...

अलर्ट : पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी कपात लागू शकते ; काय कारण जाणून घ्या..

पुणे, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज लक्षात घेता पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच एमआयडीसी क्षेत्रात १५ टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाने दिले आहेत. या निर्णयामुळे शहरावर पुन्हा एकदा पाणी टंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने २०२६ मध्ये एल-निनो आणि इंडियन ओशन डायपोल (IOD) च्या प्रभावामुळे मान्सून कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करण्याचे धोरण आखण्यात आले आहे. ३१ जुलै २०२६ पर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे, यासाठी दरमहा १५ टक्के कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (pune water cut 15 percent low rainfall 2026 khadakwasla dam)

 

 

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, शहरात सध्या लोकेशननिहाय पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागात जास्त तर काही भागात कमी पाणी मिळत असल्याचे आढळले आहे. योग्य नियोजन केल्यास १५ टक्के कपात करूनही नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करता येऊ शकतो.

 

साधू वासवानी पूल वाद: महापालिका-वाहतूक पोलीस आमने-सामने, विलंबावरून आरोप-प्रत्यारोप

 

 

शहरात सुमारे ३.५ लाख नळ कनेक्शन असून त्यापैकी सुमारे १.५ लाख अनधिकृत आहेत. याशिवाय गळती आणि चोरीमुळे जवळपास २५ टक्के पाणी वाया जात असल्याचे समोर आले आहे. ही गळती रोखण्यासाठी आणि अनधिकृत जोडण्या नियमित करण्यासाठी महापालिकेकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

 

दरम्यान, जलसंपदा विभागाने २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सध्या प्रति व्यक्ती १३५ लिटर पाणीपुरवठा केला जात असला तरी वितरणातील त्रुटींमुळे सर्व भागांना समान पाणी मिळत नाही. जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनाची शुक्रवारी महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे.

 

 

खडकवासला धरण साठा
* आज: १३.२० टीएमसी (४५.२९%)
* गेल्या वर्षी: १२.४० टीएमसी (४१.३०%)

पाणी वापराचा आढावा
* सध्या: १५६० एमएलडी पाणीपुरवठा
* कपातीनंतर: सुमारे १३०० एमएलडी
* दरमहा वापर: १.६५ टीएमसी → कपातीनंतर १.४ टीएमसी

 

 

“हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३१ जुलै २०२६ पर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध राहावे आणि टंचाई टाळता यावी, यासाठी १५ टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”
— किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

Local ad 1