...

व्हिडीओ : पुण्यात पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू असलेल्या पबवर धाड

विमाननगरमध्ये 52 युवक-युवती ताब्यात

पुणे | प्रतिनिधी
पब रात्री किती वेळेपर्यंत सुरू ठेवायचे, याबाबत स्पष्ट नियम असतानाही अनेक ठिकाणी सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर येत आहे. अशाच एका प्रकरणात विमाननगर येथील विनापरवाना सुरू असलेल्या पबवर पहाटे पाच वाजता छापा टाकत 42 युवक-युवतींना ताब्यात घेण्यात आले आहे. विमाननगर येथील ‘द नॉयर (रेड जंगल)’ या पबवर अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे अतुल कानडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही धडक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे अधीक्षक स्वतः घटनास्थळी उपस्थित राहिल्याने नियम धाब्यावर बसवून पब चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. (pune viman nagar illegal pub raid 42 youth detained excise action)

 

 

 

दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, एच विभाग, पुणे यांनी अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली विमाननगर हद्दीत कोणताही उत्पादन शुल्क परवाना नसलेल्या पबवर छापा टाकला. या कारवाईत विविध विदेशी मद्याच्या १७८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या पबचा चालक अमरजित सिंग संधु याने विनापरवाना मद्य प्राशनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६८, ८१, ८३ व ९० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पब चालकासह एकूण १० आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मद्यप्राशन करणाऱ्या ४२ युवक-युवतींवर कलम ८४ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (pune viman nagarillegal pub raid 50 youth detained excise action)

 

 

Pune excise raid: नवीन वर्षापूर्वी उत्पादन शुल्क विभागाचा धडाका; चाकणमध्ये ४२ लाखांचे परराज्य स्कॉच जप्त

 

 

कारवाईदरम्यान पबमध्ये वापरण्यात येणारे खुर्च्या, सोफा, टेबल, स्पीकर, साउंड सिस्टम, लॅपटॉप, संगणक, काचेचे ग्लास, फॉग मशीन आदी साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात एकूण ५२ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून पब चालक व व्यवस्थापक असे दोन आरोपी सध्या फरार आहेत. या गुन्ह्यात ३ लाख ६७ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हा क्र. २९०/२०२५ अंतर्गत नोंद असून न्यायालयाने संबंधित आरोपींना १० जानेवारी २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास निरीक्षक जितेंद्र पाटील करत आहेत.

 

पुणे जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्री किंवा ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर विनापरवाना पब व पार्ट्यांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ९९९९ किंवा ०२०-२६१२७३२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

 

 

❓ प्रश्न–उत्तर (Q&A )

प्रश्न 1: ही कारवाई कुठे करण्यात आली?
उत्तर: पुणे शहरातील विमाननगर परिसरात.

प्रश्न 2: पब किती वेळेपर्यंत सुरू होता?
उत्तर: पहाटे पाच वाजेपर्यंत विनापरवाना पब सुरू होता.

प्रश्न 3: किती युवक-युवतींवर कारवाई झाली?
उत्तर: एकूण ४२ युवक-युवतींवर मद्यप्राशन प्रकरणी कारवाई करण्यात आली.

प्रश्न 4: किती मद्यसाठा जप्त करण्यात आला?
उत्तर: १७८ विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

प्रश्न 5: नागरिकांनी तक्रार कुठे करावी?
उत्तर: टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ९९९९ किंवा ०२०-२६१२७३२१ वर संपर्क साधावा.

Local ad 1