Pune Crime News | गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याचे 960 बाॅक्स जप्त

राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ पुणे विभागाची धडक कारवाई.

Pune Crime News |पुणे : परराज्यातील बनावटी मद्याची वाहतूक पुणे जिल्ह्यातून बेकायदा होत असते. त्यावर पुणे उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ च्या अधिकाऱ्यांनी गोवा बनावटीच्या मद्याची (Goa-made liquor) वाहतूक होत असताना पुरंदर तालुक्यातील निरा येथे तब्बल 66 लाखांचा मद्यसाठा आणि 25 लाखांचे ट्रकअसा एकूण 91 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Stocks of Goa-made liquor worth Rs 66 lakh seized in Pune)

 

 

 

  • प्रविण परमेश्वर पवार (वय २३ वर्षे रा. तांबोळे, ता. मोहोळ जि. सोलापूर) असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. (Stocks of Goa-made liquor worth Rs 66 lakh seized in Pune)

 

 

जप्त केलेल्या गोवा बनावटीच्या मद्यासह खाली बसलेला आरोपी.  तर उभे असलेले उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि व कर्मचारी

उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निरा गावचे हद्दीत, निरा-लोणंद रस्त्यावरील हॉटेल न्यू प्रसन्ना समोरील रस्त्यावरून गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याठिकाणी सापळा लावण्यात आला.संशयित भारत बॅझ कंपनीचा ट्रक दिसून आला सदर ट्रक चालकास ट्रक रोडच्या कडेला घेण्याचा इशारा केला.  ट्रकची झडती घेतली असता, त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीस असलेला विदेशी मद्यसाठा व बिअरचा मुद्देमाल मिळून आला.(Stocks of Goa-made liquor worth Rs 66 lakh seized in Pune)

 

 

जप्त केलेला मुद्देमाल

भारत बेंझ कंपनीचा बाराचाकी ट्रक क्र. जीजे १० टि.टि. ८९७६  हा ट्रक

१) गोवा राज्यात विक्रीस असलेले ट्युबर्ग स्ट्राँग बिअरचे ५०० मि.ली. क्षमतेचे ९० बॉक्स

२) इंम्पेरियल ब्लू व्हीस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे ७९२ बॉक्स

३) इंम्पेरियल ब्लू व्हीस्कीचे ७५० मि.ली. क्षमतेचे ७८ बॉक्स विदेशी मद्यसाठा व बिअर अं. किं. रु.६६.४५,६००/- दोन मोबाईल फोन रु. ३२,०००/- व वाहन किंमत रु.२५,००,०००/- असा एकूण रूपये ९१,७७,६००/- किंमतीचा प्रो. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ नेकेली कारवाई

सदरची कारवाई  आयुक्त  कांतीलाल उमाप (Commissioner Kantilal Umap),  संचालक सुनिल चव्हाण यांचे आदेशान्वये पुणे विभागाचे विभागीय उप आयुक्त अनिल चासकर (Anil Chaskar, Divisional Deputy Commissioner, Pune Division), अधीक्षक चरणसिंग बी. राजपूत (Superintendent Charan Singh b. Rajput), उपअधीक्षक संजय आर. पाटिल, युवराज एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ पुणे या पथकाने केली.

 

गुन्हयाचा तपास निरीक्षक  तानाजी शिंदे यांच्याकडे

कारवाईत निरीक्षक तानाजी शिंदे, डी. परब, दुय्यम निरीक्षक बी. बी. नेवसे, जी. नागरगोजे, पी. डी. दळवी, वाय. एस. लोळे,  एम. डी. लेंढे, जवान एस. बी. मांडेकर, एन. जे. पडवळ, बी. राठोड, एस. पडवळ, एम. कांबळे, ए. म्हेत्रे, एम. बनसोडे, ए. यादव, आर. पोटे व महिला जवान मनिषा भोसले यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक  तानाजी शिंदे करीत आहेत.

Local ad 1