Sand Mafia। वाळू माफियांवर कारवाईसाठी महसूल अधिकाऱ्यांची पहाटे पाच वाजता छापेमारी

नांदेड जिल्ह्यात वाळू वाहतूक करणारे पाच हायवा,टाकून वाळू साठा जप्त

Sand Mafia नांदेड : बेकायदा वाळू उपसा आणि वाहतूक (Illegal sand mining and transportation) करुन साठा करुन विक्री केली जात होती. ही बाब महसूल विभागाच्या लक्षात आली. अधिकारी कारवाईसाठी पोहोचण्यापूर्वीच वाळू माफियाना टिप दिली जात होती. त्यामुळे ते रफुचक्कर होत होती. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी (Revenue Officer) वाळू माफियांच्या एक पाऊल पुढे टाकत खासगी वाहनांचा वापर करुन पहाचे पाच वाजता छापेमारी केली. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. (Sand Mafia. Revenue officials raid at 5 am to break the sand mafia)

 

शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू बेकायदा वाहतूक बिनदक्तपणे केली जात होती. यावर महसूल विभागाची नजर होती. अधिकारी कारवाईसाठी शासकीय वाहनांतून निघाले की, ते कोणत्या मार्गाने जात आहेत, सध्या कुठे आहेत, त्यांच्यासोबत किती अधिकारी -कर्मचारी आहेत, ही टिप वाळू माफियांना दिली जात होती. अधिकारी कारवाईसाठी पोहोचण्यापूर्वीच वाळू माफिया वाहनांसह रफुचक्कर होत होते. वाळू माफियांना चकवा देण्यासाठी शुक्रवारी पहाटे पाच वाजता उप विभागीय अधिकारी विकास माने यांनी अधिकाऱ्यांना बोलावून वाळू माफियांवर कारवाईसाठी जात आहोत. त्यासाठी शासकीय वाहने न वापरता दोन खासगी वाहने भाड्याने घेण्यात आली. एक पथक कल्लाळ मार्गे व दुसरे पथक मुख्य रस्ताने व काही तलाठी मोटार सायकल वर असे तीन पथके वाळू माफियांच्या मागावर निघाले. (Sand Mafia. Revenue officials raid at 5 am to break the sand mafia)

 

नांदेड शहरातील नेकलेस रोड नुरी चौक भागातील रस्त्यावर अवैध वाळू साठा करून विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणावरुन १५ ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच तो तहसील कार्यालयात आणून टाकला आहे. त्याबरोबरच वाहेगाव शिवारात अवैध वाळू उपसा करणारे १२ तराफे जाळून नष्ट केले आहेत. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ४ हायवा ट्रक, २ टिपर, १ ट्रॅक्टर व ५ टिपर (४०७) असे एकूण 12 वाहने जप्त केले. ही वाहने जप्त करून तहसील कर्यायलात आणून लावण्यात आली आहेत. (Sand Mafia. Revenue officials raid at 5 am to break the sand mafia)

 

 

जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर (Collector Pandurang Borgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड तहसीलच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकांमध्ये उप विभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार संजय वारकड व नायब तहसीलदार मुगाजी काकडे व सप्नील दिघलवार (Deputy Divisional Officer Vikas Mane, Tehsildar Sanjay Warkad, Naib Tehsildar Mugaji Kakade, Sapnil Dighalwar) यांच्यासह मंडळ अधिकारी अनिरुद्ध जोंधळे, गिरीश येवते, प्रफुल्ल खंडागळे, कुणाल जगताप, राजेंद्र शिंदे, सुजलेगावकर तलाठी मनोज देवणे, सचिन नरवाडे, विजुभाऊ रनविरकर, मोहसीन सय्यद, आकाश कांबळे, कैलास सूर्यवंशी, राम भींगोरे, नारायण गाडे, संताजी देवापूरकर, माधव भिसे यांचा सहभाग होता.

Local ad 1