पुण्यात होणार ‘भारत दर्शन’! महापालिकेची २९ राज्यांच्या संस्कृतीवर आधारित उद्याने उभारण्याची तयारी
पुणे . भारतीताल वेगवेगळया राज्याची संस्कृती आता पुणेकरांसह, देशभरातून पुण्यात येणाऱ्या पर्यटकांना अनुभवता येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून महापालिकेकडून देशभरातील २९ राज्यांच्या संस्कृतीच्या संकल्पनेवर आधारीत उद्याने उभारण्यासाठी आराखडा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. त्या सोबतच, महापालिकेची अनेक उद्याने जुनी झाल्याने ती पुनर्विकसित केली जाणार असून ती विकसित करताना त्यासाठी शहरातील वेगवेगळया कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेवून अनोख्या संकल्पनावर उभारली जावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. (pune 29 states culture theme gardens pmc plan)
नवीन वर्षाच्या प्रारंभी अनेक रेल्वे गाड्या रद्द : रद्द गाड्याचे तुमचे रिझर्वेशन तर नाही चेक चे करा
शहरात महापालिकेची सुमारे २२० हून अधिक उद्याने असली तरी त्यातील काही ठराविक उद्यानेच वेगवेगळया संकल्पनांवर आधारीत आहेत. त्यामुळे त्याच उद्यानांना पर्यटक भेट देतात. त्यामुळे सर्वच उद्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तयार केली जावीत तसेच शहरात सार्वजनिक ठिकाणे, मुख्य चौकांमध्ये सुशोभिकरण करावे यासाठी आयुक्त राम यांनी नुकतीच बैठक घेतली.
अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे उपस्थित होते. आयुक्त म्हणाले की, शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठया प्रमाणात अस्वच्छता आहे. या शिवाय, चौकांमध्येही आकर्षक असे काही नाही. शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी शहराचे सुशोभिकरण ही आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात येत आहे. त्या सोबतच संकल्पनेवर आधारीत उद्याने कमी आहेत. त्यामुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती दर्शविणारी उद्याने विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे देशभरातील कोणत्याही राज्यातील आलेल्या पर्यटकांना तिथे भेट देता येइल, सध्या शहरात फक्त पु.ल देशपांडे उद्यान हे एकमेव वेगळ्या संकल्पनेवरील उद्यान त्याच धर्तीवर इतर उद्याने विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

