पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याच कार्यक्रमातून प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी–डायस प्लॉट) येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार अधिकृतपणे सुरू करण्यात आला. (phulewada prabhag 22 prachar shubharambh ramesh bagwe)
‘गुन्हेगाराची पत्नी असली तर दोष काय?’ अजित पवारांचा थेट सवाल, टीकेला जोरदार प्रत्युत्तर
या वेळी काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफिक शेख व दिलशाद शेख हे उमेदवार उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना रमेश बागवे म्हणाले, “महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजाला ऊर्जा देणारे आहेत. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले. त्यांचे विचार पुढे नेणे ही आजच्या काळाची गरज आहे.”
पुण्याच्या कारभारावर अजित पवार संतापले; म्हणाले, ‘हे त्रिकूट हटवा, विकास हवा तर सत्ता बदला !
कार्यक्रमास जुबेरबाबू शेख, विठ्ठल थोरात, तारक शेख, राजू शेख, पप्पू परदेशी, जावेद शेख, आरिफ शेख, उफक शेख, समीर शेख, सुरेखा खंडाळे, दीपक गायकवाड, सुरेश व्यास, सुंदरम, अरुण गायकवाड यांच्यासह काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत प्रभाग २२ (काशेवाडी–डायस प्लॉट) मधील काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी फुले दाम्पत्यांच्या विचारांवर भाष्य केले.

