प्रभाग २२ काशेवाडी डायस प्लॉट : काँग्रेसतर्फे दिलशाद शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगात सुरू असून, प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी – डायस प्लॉट) येथून सर्वसाधारण महिला (क) प्रवर्गातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून दिलशाद जुबेर शेख यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. तसेच सर्वसाधारण गटातून अविनाश बागवे, अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून इंदिरा बागवे तर OBC सर्वसाधारण प्रवर्गातून रफिकभाई शेख यांनी ही अर्ज दाखल केले आहेत. (prabhag 22 kashewadi dias plot dilshad sheikh congress nomination)
या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, यासेर बागवे, विठ्ठलराव थोरात यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नेत्यांनी दिलशाद जुबेर शेख यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा देत, प्रभागातील विकास, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि नागरी प्रश्नांवर काँग्रेस पक्ष ठोस भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. काशेवाडी–डायस प्लॉट परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


