राज्यात मॉन्सूनच्या पावसाची पुन्हा सुरुवात झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर आज शुक्रवारी दक्षिण कोकणात जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. (Heavy rains in the state, rains in other districts including Nanded)
येलो अलर्ट
रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.
ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर.