Heavy Rains News । नांदेड : हवामान खात्याने नांदेडसह राज्यातील अन्य काही जिल्ह्यात पुढील काही तास अतिपावसाचा इशारा दिला आहे. गेल्या 24 तासांतही जोरदार अतिवृष्टी झाली. त्यात खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस धर्मबाद तालुक्यातील 155 मीमी पावसाची नोंद झाली आहे. (Heavy Rains in Nanded district)
नांदेड जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील धर्माबाद येथे सर्वाधिक १५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त पावसाच्या नोंदीनुसार अर्धापूर १२९, सोनखेड १२८, कापशी ११७, कंधार १०८, बिलोली १०८, नांदेड १०५, कलंबर १०५, मनाठा ९८, लोहा ९२, ऊमरी ९१, भोकर ८५, तामसा ७८, शेवडी ७६, नायगाव ६९, निवघा ६८, माळाकोळी ६३, हदगाव ६०, माहूर ४७, किनवट ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Heavy Rains in Nanded district)
Cyclone Warning : Date : 28-09-2021 Time of issue : 08:30:00 Validity : 6 hours Matter : Depression lay centered at 0530 hrs IST of 28th September 2021 over Telangana and adjoining areas of Marathwada & Vidarbha. To weaken into a Well Marked Low Pressure Area during next 06 hours. For details visit : http://rsmcnewdelhi.imd.gov.in/ Issuing authority : IMD (Heavy Rains in Nanded district)
नांदेड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, सोलापूर, सातारा जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी 30-40 किलोमीटर प्रतितासापर्यंत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. रायगड रत्नागिरी जळगाव औरंगाबाद धुळे नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील 3-4 तासात. बाहेर जाताना खबरदारी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे. (Heavy Rains in Nanded district)
नांदेड येथील नदीकाठावरचे शेकडो शेतक-यांचे शेत अतिवृष्टीत खरडुन गेल्याने पीकांसह जमीनीच शेती उपयोगी राहिल्या नाही, शासन व पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे तात्काळ 100 टक्के विमा मंजूर करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारुख अहेमद यांनी केली आहे.
Web Title : Heavy Rains in Nanded district