Heavy Rains । नांदेड जिल्ह्यात ‘इतक्या’ महसूल मंडळात अतिवृष्टी

Heavy Rains । नांदेड : हवामान विभागाने अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद असून, गेल्या 24 तासांत सरासरी 99 मी मी पाऊस झाला आहे. परिणामी अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी शक्य तो प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Heavy Rains in Nanded district)

 

 

नांदेड जिल्ह्यातील तेरा तालुक्यांसह 65 मंडळात अतिवृष्टी सरासरी 90.98 मिलिमीटर पाऊस झाला आहे.  पस्तीस मंडळात शंभर मिलिमीटर मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. येणाऱ्या काही तास अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.  (Heavy Rains in Nanded district)

 

 

नांदेड जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यातील धर्माबाद येथे सर्वाधिक १५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त पावसाच्या नोंदीनुसार अर्धापूर १२९, सोनखेड १२८, कापशी ११७, कंधार १०८, बिलोली १०८, नांदेड १०५, कलंबर १०५, मनाठा ९८, लोहा ९२, ऊमरी ९१, भोकर ८५, तामसा ७८, शेवडी ७६, नायगाव ६९, निवघा ६८, माळाकोळी ६३, हदगाव ६०, माहूर ४७, किनवट ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Heavy Rains in Nanded district)

 

Local ad 1