Sharad Pawar Resigns । शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा समितीने फेटाळला

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांची पत्रकार परिषदेत माहिती

Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (National Congress Party) सदस्या समितीने शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला आहे. त्यासंदर्भात ठराव एकमताने पारित केला आहे. (The committee rejected Sharad Pawar’s resignation as president)

 

वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या पुढील आठवड्यात होणार बदल्या ?

 

‘लोक माझे सांगाती’ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. साहेब निर्णय मागे घ्या, कार्यकर्त्यांनी मागणी करत ठिय्या दिला होता. शरद पवारांनी त्या वेळी चेंडू राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या कोर्टात टोलावला होता. या समितीची आज बैठक झाली. (The committee rejected Sharad Pawar’s resignation as president)

 

 

 

शरद पवार यांनी दिलेला राजीनामा एकमताने नामंजूर करण्याचा ठराव पारीत केला आहे. पवार साहेबांनी पदावार कायम रहावे, अशी विनंती करण्यात आली आहे, अशी  माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. (The committee rejected Sharad Pawar’s resignation as president)

 

 

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. सध्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच एका कार्यकर्त्याने प्रदेश कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही कार्यकर्त्यांना वारंवार शांत राहण्याचे आवाहन करत आहेत. (The committee rejected Sharad Pawar’s resignation as president)

Local ad 1