Andheri Bypoll Election।अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करा : शरद पवार

Andheri Bypoll Election : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Deputy Chief Minister Devendra Phadnis) यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. त्यावर चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे लक्ष असणार आहे.

 

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके (Rituja Ramesh Latke) यांच्या समर्थन करत आज पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पवार बोलत होते. (Make Andheri Bypoll Election unopposed – Sharad Pawar)

 

पवार म्हणाले, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची (Andheri Bypoll Election) प्रक्रिया सुरू असून, मेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहे. मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकी झाली.  मी राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून तेंव्हा भूमिका घेतली होती की, मुंडेच्या परिवारातील कोणीही उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

 

शरद पवार म्हणाले, रमेश लटके यांचा योगदान पाहता. ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य राहील, त्यातून एक चांगला संदेश जाईल. महाराष्ट्रत योग्य संदेश जाण्यासाठी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे, यावेळी शरद पवार यांनी भाजप आणि इतर उमेदवारांना आवाहन केलं आहे की, अंधेरी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करू नका. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. अर्ज मागे घेण्याची मुदत अजून संपली नाही, म्हणून आवाहन केले. Make Andheri Bypoll Election unopposed – Sharad Pawar)
Local ad 1