हुश्श..! चांदणी चौक पूल प्रकल्पाचे उद्घाटन 12 ऑगस्टला !

पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या 12 ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते लोकार्पणे करण्याचे नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil)  यांनी भेट देऊन पहाणी केली. (Chandni Chowk bridge inaugurated on August 12!)

 

 

यावेळी प्रकल्प संचालक संजय कदम, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या स्थानिक भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून चांदणी चौकात उड्डाणपूल, सेवा रस्ता उभारण्यात येत असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.  (Chandni Chowk bridge inaugurated on August 12!)

 

 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पुण्यातील चांदणी चौकात उभारण्यात येणार्‍या उड्डाणपुला प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या 12 ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजित आहे. पुणेकरांसाठी चांदणी चौक हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे त्याचे उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करावे. त्यासोबतच कामात कोणतीही त्रुटी राहू नये, याची खबरदारी घ्यावी. पावसाची शक्यता लक्षात घेऊन, उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी केल्या आहेत.

Local ad 1