पुणे : भोर-वेल्हा उपविभागात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 साठी भाडेतत्वावर जमीन देण्यासाठी पात्र व इच्छुक शेतकरी खातेदार व जमीन धारकांनी पुढील दोन दिवसांत संपर्क अधिकार्यांशी आवश्यक माहितीसह संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. (mukhyamantri solar krushi vahini yojana 2.0 maharashtra)
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 करिता वेल्हा तालुक्यातील पाबे, आणि भोर तालुक्यातील कामथडी, खानापूर आणि निगुडघर या सब स्टेशनच्या पाच कि.मी.च्या परिघातील कमीत कमी तीन एकर सलग असलेली खाजगी जमीन महावितरण कंपनीस भाडे तत्वावर हवी आहे. त्याबदल्यात प्रती एकर प्रती वर्ष 50 हजार रुपये अथवा प्रती हेक्टरी प्रती वर्ष 1 लाख 25 हजार रुपये इतके वार्षिक भाडे सदर कंपनी देणार असून यामध्ये प्रती वर्ष 3 टक्के इतकी वाढ कंपनीकडून देण्यात येणार आहे.