Special Intensive Revision – SIR : मतदारयादी विशेष पुनरावलोकन मोहीम सुरू ; ही कागदपत्रे तयार ठेवा !
३० जूनपासून घराघरांत पडताळणी सुरू; नाव समाविष्ट, वगळणे आणि दुरुस्तीसाठी नागरिकांनी कागदपत्रे तयार ठेवावीत
Special Intensive Revision – SIR मुंबई: राज्यातील मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) मोहीम जाहीर केली आहे. महाराष्ट्रासह देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम ३० मेपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार असून, महाराष्ट्रात प्रत्यक्ष घराघरांत पडताळणी ३० जूनपासून सुरू होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, या मोहिमेचा उद्देश केवळ पात्र मतदारांची नोंद ठेवणे आणि अपात्र किंवा डुप्लिकेट नावे वगळणे हा आहे. देशभरातील सुमारे ३७.६३ कोटी मतदार या प्रक्रियेत समाविष्ट असतील.
महाराष्ट्रातील महत्त्वाचे वेळापत्रक
* BLO प्रशिक्षण : २० जून ते २९ जून
* घराघरांत पडताळणी : ३० जून ते २९ जुलै
* प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध : ५ ऑगस्ट
* दावे व हरकती : ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर
* अंतिम मतदार यादी : ७ ऑक्टोबर २०२६
नागरिकांना काय करावे लागेल?
एसआयआर मोहिमेदरम्यान ब्लॉक लेव्हल ऑफिसर (BLO) आणि बूथ लेव्हल एजंट (BLA) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. नागरिकांकडून आवश्यक फॉर्म भरून घेतले जातील. १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना नवीन मतदार म्हणून नोंदणी करता येईल. मृत किंवा स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळली जातील. एका व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी असल्यास एक नाव रद्द करावे लागेल. नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात दुरुस्ती करता येईल.
ज्याची भीती होती तेच घडलं ! पेट्रोल-डिझेल दरवाढ ; जाणून घ्या आजचे नवे दर
मतदार पडताळणीसाठी खालील कागदपत्रे वैध मानली जाणार आहेत
* आधार कार्ड
* जन्म प्रमाणपत्र
* पासपोर्ट
* दहावीची गुणपत्रिका
* सरकारी ओळखपत्र
* पेन्शनर ओळखपत्र
* कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र
* जात प्रमाणपत्र
* जमीन/घर वाटप पत्र
* कुटुंब नोंदणी दस्तऐवज
एसआयआर मोहीम का महत्त्वाची?
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, १९५१ ते २००४ दरम्यान नियमितपणे विशेष पुनरावलोकन मोहीम राबवली जात होती. मात्र गेल्या दोन दशकांत स्थलांतर, मृत्यूनंतरही यादीत कायम राहणारी नावे, डुप्लिकेट नोंदी आणि अपात्र व्यक्तींची नावे वाढल्याने मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी ही मोहीम आवश्यक ठरली आहे.
यामुळे पात्र मतदार वंचित राहणार नाहीत आणि निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
Maharashtra Rain Update : शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी !
इतर राज्यांतील अंतिम मतदार यादी
* ६ सप्टेंबर : ओडिशा, सिक्कीम, मिझोराम, मणिपूर
* ७ ऑक्टोबर : महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, मेघालय, झारखंड
* ११ नोव्हेंबर : आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंदीगड
* २ डिसेंबर : तेलंगणा, नागालँड, दादरा-नगर हवेली, दमण-दीव
* २३ डिसेंबर : त्रिपुरा, उत्तराखंड

